वेड्यांची दुनिया…

लहानपणी भोंडल्याची गाणी सुरू झाली की सासू सुनेच्या तक्रारींच्या गाण्यापेक्षा शेवटी येणाऱ्या एका गाण्याची वाट आम्ही बघत असायचो… श्रीकांता कमला कांता अस्स कस्स झालं? असं कसं झालं माझ्या नशिबी आलं.. वेड्याच्या बायकोने केले होते लाडू ..तिकडून आला वेडा त्यानं डोकावून पाहिले…चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले…साधारण या प्रकारचं गाणं सुरू झालं की आमची हसून हसून […]

वेड्यांची दुनिया…

लहानपणी भोंडल्याची गाणी सुरू झाली की सासू सुनेच्या तक्रारींच्या गाण्यापेक्षा शेवटी येणाऱ्या एका गाण्याची वाट आम्ही बघत असायचो… श्रीकांता कमला कांता अस्स कस्स झालं? असं कसं झालं माझ्या नशिबी आलं.. वेड्याच्या बायकोने केले होते लाडू ..तिकडून आला वेडा त्यानं डोकावून पाहिले…चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले…साधारण या प्रकारचं गाणं सुरू झालं की आमची हसून हसून पुरे वाट व्हायची. पण आता विचार केला की लक्षात यायचं … वेड्याला बायको असते, मुलं असतात, संसारही असतो, अगदी वेड्यांसाठी इस्पितळसुद्धा असतं.. शाळा असतात ..म्हणून तर मी हे वेड्यासारखं सगळं बघायचं ठरवलं. आमच्या शेजारचा दादा पलीकडच्या मुलीकडे बघून गाणं म्हणत असायचा ‘हे वेड मजला लागले’  स्वत:हून वेड लागण्याची कबुली देणं किती अवघड असतं, पण त्याने ती दिली आणि पुढची ओळसुद्धा म्हटली, तुजलाही ते लागेल का? म्हणजे ती पण वेडी व्हावी अशी आशा व्यक्त करताना पाहिलं आणि लक्षात आलं की वेड्यांच्या नादी वेडेच लागतात असो. आमच्या इथे शेजारी वडील आणि मुलगा फुटबॉलचे अगदी चाहते. ते एकदा मुलाची मॅच बघायला गेले. मॅच चालू असताना इतके उड्या मारून प्रोत्साहन देत होते की मुलाची टिम जिंकल्यावर, त्या आनंदात वडिलांनी बाळेवाडीच्या स्टेडियमच्या पहिल्या मजल्यावरून जोरदार उडी मारली आणि मुलाला भेटायला गेले. त्यांच्या नंतर लक्षात आलं की आपल्या पायाला फ्रॅक्चर झाले. या वेडाला काय म्हणायचं?. एखादी गोष्ट कळून समजून आपण करत राहणं आणि त्यातूनच चांगली गोष्ट निर्माण करणं हे वेड समाजाच्या, जगाच्या कल्याणासाठी खूप उपयोगी ठरते. असे ध्येयवेडे, शास्त्रज्ञ, डॉक्टर, विचारवंत, संशोधक एका प्रकारच्या वेडाने झपाटून काम करणारे असतात. पण काही वेळा मात्र खूप लोक काळजीपूर्वक आपलं वेड जपत असतात, भविष्यात दुष्काळ पडेल म्हणून शेळ्यांना नारळाच्या झाडावर चढायचं प्रशिक्षण देणारे म्हणजेच भविष्यासाठी वर्तमान बिघडवणारे ठरतात. अशी माणसं आम्हाला शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे आणि शेअरच्या वेडासाठी आपलं आयुष्य घालवणारे सुद्धा दिसतात, लक्षात येतात. पण वेड पांघरून काम करणारे दीडशहाणे समाजाला मात्र खूप घातक असतात. आपण समाजाच्या कल्याणासाठीच काम करतोय असं दाखवून त्यांच्यातलेच एक आहोत किंवा त्यांचे मसिहा आहोत असं सांगून नेतेगिरी करून स्वत:चा फायदा करून घेत असतात. विनयशील तेच पांघरून पांघरत असतात. अशावेळी अति विनायम धुर्तस्य लक्षण… असं म्हणावसं वाटतं. अनेक घरात निरनिराळ्या प्रकारच्या आवडीनिवडी असलेले लोक पाहायला मिळतात. तेही खरं म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचे वेडच. काही काही लोकांच्या घरी खाणे आणि खाऊ घालणे याचा कार्यक्रम सुरू असतो. त्यांना ते वेडच असतं. खाण्याचं वेड अगदी कर्जबाजारी होईपर्यंत ते जोपासत असतात. (पूर्वार्ध)