शहरात खेकडे विक्री जोमात
बेळगाव : पावसाळ्याची चाहूल लागली की खवय्यांना खेकड्यांची आठवण होते. पहिल्या पावसातील खेकड्यांची चव काही वेगळीच असल्याने खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडतात. सध्या फिश मार्केट व खासबाग सर्कल येथे खेकडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. बेळगावमध्ये आसपासच्या भागासोबतच हिडकल जलाशय परिसरातील खेकडे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. फिश मार्केट समोरील रस्त्यावर खेकड्यांचा हा बाजार भरतो. त्याचबरोबर खासबाग सर्कल येथेही खेकड्यांची विक्री केली जाते. रविवारी खासबागचा बाजार असल्याने खेकडे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत खेकडे विक्री जोमात सुरू होती. 30 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत जोडी आकारमानानुसार खेकड्यांची विक्री करण्यात येत आहे. सध्या हॉटेलमध्येही खेकडा फ्राय, खेकडा थालीचे पदार्थ सुरू करण्यात आल्याने खेकड्यांची मागणी वाढली आहे.
Home महत्वाची बातमी शहरात खेकडे विक्री जोमात
शहरात खेकडे विक्री जोमात
बेळगाव : पावसाळ्याची चाहूल लागली की खवय्यांना खेकड्यांची आठवण होते. पहिल्या पावसातील खेकड्यांची चव काही वेगळीच असल्याने खरेदीसाठी खवय्यांच्या उड्या पडतात. सध्या फिश मार्केट व खासबाग सर्कल येथे खेकडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. बेळगावमध्ये आसपासच्या भागासोबतच हिडकल जलाशय परिसरातील खेकडे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. फिश मार्केट समोरील रस्त्यावर खेकड्यांचा हा बाजार […]