आंबेगाव येथे ट्रकचालकाला मारहाण करून शेण खाऊ घालणाऱ्या दोन स्वयंघोषित गोरक्षकांना अटक

पुण्यातील आंबेगाव येथे ट्रकचालकाला मारहाण करून अमानवीय वागणूक देणाऱ्या दोन स्वयंघोषित गोरक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आंबेगाव येथे ट्रकचालकाला मारहाण करून शेण खाऊ घालणाऱ्या दोन स्वयंघोषित गोरक्षकांना अटक

पुण्यातील आंबेगाव येथे ट्रकचालकाला मारहाण करून अमानवीय वागणूक देणाऱ्या दोन स्वयंघोषित गोरक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरातील मंचर-नारायणगाव महामार्गावर एका ट्रकचालकाला संशयावरून अडवून, त्याला बेदम मारहाण करण्यात आली. केवळ मारहाणच नाही, तर त्याला अमानवीय वागणूक म्हणजेच जबरदस्तीने शेण खाऊ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. व दोन स्वयंघोषित गोरक्षकांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ट्रकचा अधिकृत परवाना होता आणि त्यात नियमांनुसारच वाहतूक सुरू होती. तरीही या तरुणांनी ‘कायद्याचा हातात’ घेत हे कृत्य केले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक (SP) यांनी स्पष्ट केले आहे की,”कोणालाही कायद्याचा भंग करण्याचा किंवा स्वतःच्या हातात कायदा घेण्याचा अधिकार नाही. प्राणी संवर्धन किंवा संरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांवर कठोर ‘मोक्का’ लावण्याबाबतही विचार केला जाईल.”

ALSO READ: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा मुंबईत पोहचले; आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार
तसेच सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ पसरवू नका, असे आवाहन सायबर सेलने केले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

ALSO READ: “रागाच्या भरात मुलगी वडिलांवर बलात्काराचा आरोप करेल अशी कल्पना करणे कठीण आहे,” मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली
Edited By- Dhanashri Naik

Go to Source