रामतळे ‘एमआरएफ’ शेडला न्यायालयाची स्थगिती

म्हापसा : रामतळे येथे उभारल्या जाणाऱ्या  एमआरएफ (मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी) शेडचे बांधकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी दिल्यानंतर हळदोणा पंचायतीला गुरुवारी सदर काम स्थगित ठेवण्यास भाग पडले. हळदोणा सरपंच, सचिव तसेच हळदोणा कोमुनिदाद बोआ एस्पेरन्सरच्या व्यवस्थापकीय समिती आणि विष्णू नाईक यांनी कागदपत्रांसह येत्या 2 जानेवारी रोजी कार्यालयात हजर रहावे असेही आदेशात म्हटले आहे. […]

रामतळे ‘एमआरएफ’ शेडला न्यायालयाची स्थगिती

म्हापसा : रामतळे येथे उभारल्या जाणाऱ्या  एमआरएफ (मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी) शेडचे बांधकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी दिल्यानंतर हळदोणा पंचायतीला गुरुवारी सदर काम स्थगित ठेवण्यास भाग पडले. हळदोणा सरपंच, सचिव तसेच हळदोणा कोमुनिदाद बोआ एस्पेरन्सरच्या व्यवस्थापकीय समिती आणि विष्णू नाईक यांनी कागदपत्रांसह येत्या 2 जानेवारी रोजी कार्यालयात हजर रहावे असेही आदेशात म्हटले आहे. कोमुनिदाद प्रशासक सागर गावडे यांनी आदेशात म्हटले आहे की, रामतळेच्या रहिवाशांनी तक्रार दिली आहे की, हळदोणा कोमुनिदाद बोआ एस्पेरन्सरच्या लिपिक व समितीने सर्व्हे क्र. 343 / 16मध्ये बांधकामास एनओसी अवैधपणे जारी केली आहे. त्यामुळे काम स्थगित ठेवण्यात यावे. शेड उभारणीबाबत सर्वांना विश्वासात घेतले होते. अनेकांनी आवश्यक सूचना केल्या होत्या. मात्र बुधवारी घडलेला प्रकार हा चुकीचा होता. तसेच कुणीही पंचायत कार्यालयात चर्चेसाठी आले नाही. आम्ही त्यांची सायंकाळपर्यंत बुधवारी वाट पाहिली. माझा पुतळा दहन केल्याप्रकरणी मी पोलिसांत तक्रार देणार आहे.