माळमारुती पोलीस-उपायुक्तांना न्यायालयाची नोटीस

समितीचे शुभम शेळके यांच्याकडून याचिका दाखल बेळगाव : आनंदवाडीच्या आखाड्यामध्ये उद्योजकांनी महाराष्ट्र राज्य म्हणण्यास विरोध केला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून म. ए. समितीचे शुभम शेळके यांनी त्याचा निषेध नोंदविला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याबाबत जिल्हासत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता पोलीस उपायुक्त आणि […]

माळमारुती पोलीस-उपायुक्तांना न्यायालयाची नोटीस

समितीचे शुभम शेळके यांच्याकडून याचिका दाखल
बेळगाव : आनंदवाडीच्या आखाड्यामध्ये उद्योजकांनी महाराष्ट्र राज्य म्हणण्यास विरोध केला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून म. ए. समितीचे शुभम शेळके यांनी त्याचा निषेध नोंदविला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. ही कारवाई बेकायदेशीर असल्याबाबत जिल्हासत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता पोलीस उपायुक्त आणि माळमारुती पोलिसांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. म. ए. समितीचे शुभम शेळके यांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन न करता त्याचा निषेध नोंदविला होता. मात्र पोलिसांनी जाणूनबुजून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याचबरोबर न्यायालयीन कोठडीतही त्यांची रवानगी केली होती. यामुळे शुभम शेळके यांनी सदर कारवाई घटनेच्या विरोधात असून तो गुन्हा रद्दबातल ठरवावा, याचबरोबर पाच लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशा मागणीची याचिका अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बेंद्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे यांनी दाखल केली आहे.