न्यायालयीन अटक वॉरंटमुळे प्रज्ज्वलच्या अडचणीत वाढ

न्यायालयीन अटक वॉरंटमुळे प्रज्ज्वलच्या अडचणीत वाढ

परदेशात लपून बसलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी, हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याने आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शनिवारी तपासकर्त्यांनी फरार असलेल्या प्रज्ज्वलच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. याचिका स्वीकारून न्यायालयाने अटक वॉरंट जारी करत प्रज्ज्वलवरील कायदेशीर फास आणखी घट्ट केला. एसआयटीने प्रज्वलला सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी यापूर्वीच नोटीस बजावली होती. लुकआउट नोटीसनंतर ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. मात्र, प्रज्ज्वल परदेशातून परतत चौकशीला हजर झालेला नाही.