कॉसमॅक्स एफसी, दर्शन एफसी विजयी
लोकमान्य चषक बीडीएफए फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून कॉसमॅक्सने फॅन्को संघाचा तर दर्शन एफसीने टिळकवाडी इलेव्हनचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कॉसमॅक्सने फॅन्केचा 9-1 असा पराभव केला. या सामन्यात 26 व्या मिनिटाला मुस्ताकने पहिला गोल केला. 30 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या अफानने दुसरा गोल करून 2-0 च्या आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्षेत्रात ज्यादा वेळेत जैनुद्दीन मुजावरने तिसरा गोल करून पहिल्या सत्रात 3-0 आघाडी मिळवुन दिली. दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला विंन्सटने चौथा गोल केला. 44 मिनिटाला फॅन्कोच्या श्रेयस देसाईने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 46 मिनिटाला अल्तमशने पाचवा गोल गेला. 50 व्या मिनिटाला जमदने सहावा गोल केला. 56 व 58 व्या मिनिटाला मुजम्मिलने सलग दोन गोल करून 8-0 ची आघाडी मिळवून दिली. 60 व्या मिनिटाला कॉसमॅक्सच्या जमीदने 9 वा गोल करून दिला. दुसऱ्या सामन्यात दर्शन एफसीने टिळकवाडी इलेव्हनचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले त्यामुळे गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला दर्शनच्या अखिल पाटीलने गोल करून 1-0 आघाडी मिळवून दिली.
Home महत्वाची बातमी कॉसमॅक्स एफसी, दर्शन एफसी विजयी
कॉसमॅक्स एफसी, दर्शन एफसी विजयी
लोकमान्य चषक बीडीएफए फुटबॉल स्पर्धा बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून कॉसमॅक्सने फॅन्को संघाचा तर दर्शन एफसीने टिळकवाडी इलेव्हनचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कॉसमॅक्सने फॅन्केचा 9-1 […]
