India Tourism : उन्हाळ्याची चाहूल लागली असून अनेक जण उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये फिरायला जातात. तसेच उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आणि मन प्रसन्न करण्यासाठी काही ‘थंडगार’ पर्यटनस्थळे आज आपण पाहणार आहोत. जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
उत्तर भारतातील बर्फाळ आणि अतिथंड ठिकाणे
जर तुम्हाला उन्हाळ्यातही स्वेटर घालावा लागेल इतकी थंडी हवी असेल, तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहे.
लेह-लडाख (लडाख)
येथील निळे पांगॉन्ग सरोवर आणि बर्फाच्छादित डोंगर उन्हाळ्यात अतिशय सुंदर दिसतात. साहसी लोकांसाठी हे नंदनवन आहे.
मनाली आणि सिमला (हिमाचल प्रदेश)
रोहतांग पासमध्ये तुम्हाला उन्हाळ्यातही बर्फ पाहायला मिळू शकतो. कुटुंबासोबत जाण्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे.
गुलमर्ग (काश्मीर)
याला ‘फुलांचे मैदान’ म्हणतात. येथील ‘गोंडोला राईड’ (केबल कार) जगातील सर्वात उंच राईड्सपैकी एक आहे.
औली (उत्तराखंड)
येथील उंच डोंगररांगा आणि ओकची झाडे तुम्हाला स्वित्झर्लंडची आठवण करून देतील.
ALSO READ: उत्तराखंडमधील औली या ठिकाणी स्वर्गात असल्यासारखे वाटते
दक्षिण भारतातील हिरवेगार आणि शांत ठिकाणे
दाट झाडी आणि चहाच्या मळ्यांमुळे या ठिकाणी हवामान खूप आल्हाददायक असते.
मुन्नार (केरळ)
चहाचे मळे, धबधबे आणि धुके यामुळे हे ठिकाण खूप ‘कूल’ वाटते.
ऊटी (तामिळनाडू)
‘पर्वतांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊटीमध्ये बोटिंग आणि टॉय ट्रेनचा आनंद घेता येतो.
कूर्ग (कर्नाटक)
येथील कॉफीचे मळे आणि जंगलातील थंडावा मनाला शांत करतो.
ALSO READ: Munnar मुन्नार थंड हवेचे ठिकाण आणि चहा-कॉफीचे मळे
ईशान्य कडील निसर्गरम्य ठिकाणे
गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत जायचे असेल तर
गंगटोक (सिक्कीम)
कांचनगंगा शिखराचे दर्शन आणि सरोवरांचा गारवा येथे अनुभवायला मिळतो.
शिलॉन्ग (मेघालय)
याला ‘पूर्वेकडील स्कॉटलंड’ म्हणतात. येथील पाऊस आणि धबधबे उन्हाळा विसरायला लावतात.
ALSO READ: Bhedhaghat Dhuandhar Waterfall Madhya Pradesh निसर्गाच्या कुशीत वसलेले भेडाघाट
महाराष्ट्रातील जवळची थंड हवेची ठिकाणे
कमी वेळेत आणि कमी खर्चात जायचे असेल तर
महाबळेश्वर
पाचगणी येथील स्ट्रॉबेरी गार्डन आणि व्ह्यू पॉइंट्स प्रसिद्ध आहेत.
माथेरान
वाहनांना बंदी असल्याने येथील शांतता आणि थंडावा मनाला खूप भावतो.
चिखलदरा
विदर्भातील हे एकमेव थंड हवेचे ठिकाण असून येथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
ALSO READ: The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते
