Cooking Tips: जेवणाला चविष्ट बनवतील या सोप्या टिप्स

जेवण बनवण्याची आवड सर्वांना असते. पण खूप वेळेस छोट्या छोट्या चुकांनी जेवणाची चव बिघडते. आशावेळेस या काही टिप्स अवलंबवा म्हणजे जेवणाची चव टिकून राहील. 1. कुठल्यापण रस्सेदार भाजीला घट्ट करायची असेल तर तुपात भाजलेली पोळी बारीक करून भाजीत टाकणे यामुळे …

Cooking Tips: जेवणाला चविष्ट बनवतील या सोप्या टिप्स

जेवण बनवण्याची आवड सर्वांना असते. पण खूप वेळेस छोट्या छोट्या चुकांनी जेवणाची चव बिघडते. आशावेळेस या काही टिप्स अवलंबवा म्हणजे जेवणाची चव टिकून राहील. 

 

1. कुठल्यापण रस्सेदार भाजीला घट्ट करायची असेल तर तुपात भाजलेली पोळी बारीक करून भाजीत टाकणे यामुळे भाजी घट्ट होईल आणि चविष्ट देखील लागेल.  

 

2. पराठा शेकतांना तेल किंवा तूपाचा वापर करू नये तर बटरचा उपयोग करणे पराठे चविष्ट लागतील . 

 

३. बटाटयाची कोरडी किंवा रसेदार भाजी बनवत असाल तर त्यात एक वेलदोडा घालणे. नविन स्वाद येईल. 

 

4. मटर , चवळी , हिरवे हरभरे तसेच इतर कडधान्यांची भाजी बनवत असाल तर शिजतांना त्यांचा रंग जाऊ नये म्हणून त्यात चिमुटभर साखर टाकणे .

 

5. कालवणात जर जास्त मीठ झाले तर त्यात कणकेचे छोटे छोटे गोळे टाकणे यामुळे मीठ कमी होईल व वाढतांना ते गोळे काढून घेणे. 

 

6. भाजीला फोडणी करतांना तेलात पहिले हळदी पावडर टाकणे यामुळे तेलाचे थेंब उडणार नाही. 

 

7. भाजीत तिखट जास्त झाले असेल तर थोडसा टोमॅटो सॉस टाकणे किंवा दही मिक्स करणे . यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल. 

 

8. भजे बनवतांना घोळ मध्ये अर्धा चमचा मैदा घालणे. भजे कुरकुरित आणि चविष्ट बनतील . 

 

9. नुडल्सला उकळवतांना त्यात थोडेसे मीठ आणि तेल टाकणे . व चाळणीत काढल्यावर थंड पाणी टाकणे यामुळे नूडल्स चिटकणार नाही व छान मोकळे होतील.

 

10. पनीर जर जास्त घट्ट झाले असेल तर कोमट पाण्यात चिमुटभर मीठ टाकून त्यात पनीरला 10 मिनिट करीता सोडणे. यामुळे पनीर नरम होईल आणि स्वाद देखील वाढेल.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik