अग्निवीर वायू सैनिकांचा दीक्षांत सोहळा
बेळगाव : एअरमन ट्रेनिंग स्कूल, सांबरा-बेळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर वायू सैनिकांचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. कवायत मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 386 अग्निवीर वायू सैनिकांना देशरक्षणाची शपथ देण्यात आली. या सोहळ्याला स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अनिमेश भार्गव उपस्थित होते. अग्निवीर सैनिकांनी तांत्रिक ज्ञान, कौशल्य यांच्या आधारे सदैव देशरक्षणाच्या कार्यात आघाडीवर रहावे, असे आवाहन स्टेशन कमांडर अनिमेश भार्गव यांनी केले. वायू सैनिकांनी उत्कृष्ट पथसंचलन केले. प्रशिक्षणादरम्यान उत्तम काम केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बेस्ट इन हाऊसकिपिंग ट्रेडसाठी अमितकुमार, बेस्ट इन हॉस्पिटॅलिटीसाठी सुजित भट्ट, बेस्ट इन ग्राऊंड ट्रेनिंगसाठी एस. हरिष व एन. सी. बिटूकुमार ठाकुर यांना पारितोषिक विभागून देण्यात आले.
Home महत्वाची बातमी अग्निवीर वायू सैनिकांचा दीक्षांत सोहळा
अग्निवीर वायू सैनिकांचा दीक्षांत सोहळा
बेळगाव : एअरमन ट्रेनिंग स्कूल, सांबरा-बेळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर वायू सैनिकांचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. कवायत मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 386 अग्निवीर वायू सैनिकांना देशरक्षणाची शपथ देण्यात आली. या सोहळ्याला स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अनिमेश भार्गव उपस्थित होते. अग्निवीर सैनिकांनी तांत्रिक ज्ञान, कौशल्य यांच्या आधारे सदैव देशरक्षणाच्या कार्यात आघाडीवर […]
