कॉपीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे परीक्षेवर नियंत्रण

गटशिक्षणाधिकारी-जिल्हा पंचायत कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष बेळगाव : कॉपीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यावर्षी दहावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच त्याचे नियंत्रण प्रत्येक गटशिक्षणाधिकारी विभागस्तरावर करण्यात आले आहे. सीसीटीव्ही नियंत्रणासाठी चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक वर्गावर सीसीटीव्हीमुळे लक्ष ठेवणे सोयिस्कर ठरत आहे. कॉपीच्या प्रकारामुळे वर्षभर […]

कॉपीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे परीक्षेवर नियंत्रण

गटशिक्षणाधिकारी-जिल्हा पंचायत कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष
बेळगाव : कॉपीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यावर्षी दहावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच त्याचे नियंत्रण प्रत्येक गटशिक्षणाधिकारी विभागस्तरावर करण्यात आले आहे. सीसीटीव्ही नियंत्रणासाठी चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक वर्गावर सीसीटीव्हीमुळे लक्ष ठेवणे सोयिस्कर ठरत आहे. कॉपीच्या प्रकारामुळे वर्षभर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यापूर्वी भरारी पथक, पोलीस संरक्षण यासह इतर उपाययोजना केल्या जात होत्या. तरीही कॉपीचे प्रकार काही केल्या थांबत नव्हते. मागीलवर्षी हिरेबागेवाडी येथे सामूहिक कॉपीचा प्रकार घडला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या शिक्षण विभागाने यावर्षी प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे विद्यार्थी परीक्षा लिहीत असताना त्या-त्या वर्गात कोण मदत करत आहे? तसेच बाहेरून कॉपी कोणी देत आहे का? यावर नियंत्रण आले आहे. बेळगाव शहरासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये चार मुख्याध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. मोठ्या स्क्रीन लावून त्यावर सीसीटीव्हीचे फुटेज दाखविण्यात येत आहेत. एखाद्या वर्गात कॉपी होत असल्याचे दिसून येताच संबंधित पर्यवेक्षक व केंद्र प्रमुखांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा पंचायतीतून जिल्ह्यावर लक्ष
बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये बेळगाव ग्रामीणसह जिल्ह्यातील शाळांवर नियंत्रण ठेवले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास येताच संबंधित केंद्र प्रमुखांना फोन करून शहानिशा केली जात आहे. याठिकाणी शिक्षकांची नेमणूक करून प्रत्येक वर्गाचे फुटेज काटेकोरपणे तपासले जात आहे.
चार मुख्याध्यापकांची नियुक्ती
कॉपीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून याचे नियंत्रण गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून केले जात आहे. शहरामध्ये 9 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरू असून त्यातील प्रत्येक वर्गातील फुटेज नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचत आहेत. यासाठी चार मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
– आय. डी. हिरेमठ (सीआरसी बेळगाव शहर)