शहर परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा

रोगराईची भीती; नागरिकांमध्ये चिंता : एलअॅण्डटी कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराबाबत संताप  बेळगाव : शहरात दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सर्वत्र दूषित-गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. विशेषत: शहरातील बुडा कॉलनी, पाईपलाईन रोड आणि गणेशपूर भागात दूषित पाण्याचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. एलअॅण्डटी कंपनीच्या दुर्लक्षपणाबाबत संताप व्यक्त होत आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून […]

शहर परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा

रोगराईची भीती; नागरिकांमध्ये चिंता : एलअॅण्डटी कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराबाबत संताप 
बेळगाव : शहरात दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सर्वत्र दूषित-गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. विशेषत: शहरातील बुडा कॉलनी, पाईपलाईन रोड आणि गणेशपूर भागात दूषित पाण्याचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. एलअॅण्डटी कंपनीच्या दुर्लक्षपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.
एलअॅण्डटी कंपनीकडून 24 तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान जलवाहिनींना गळती लागत असून याद्वारे दूषित पाणी मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर रोगांचा फैलाव सुरू आहे. त्यातच नळांना दूषित-गढळू पाणी आल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात चार दिवसाआड पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. त्यातच दूषित आणि गढूळ पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना इतर ठिकाणाहून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. अपायकारक पाणी पुरवठ्यामुळे कावीळ, उलटी आणि जुलाबसारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे .एकीकडे आरोग्य विभागामार्फत शुद्ध आणि स्वच्छ पाण्याविषयी जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे  एलअॅण्डटी कंपनीकडूनच दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
एलअॅण्डटी गांभीर्य घेणार का?
विजयनगर बुडा कॉलनी आणि गणेशपूर भागात 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी खोदाई केली जात आहे. दरम्यान जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. नळांना दूषित आणि गढूळ पाणी आल्याने वापराविना टाकून द्यावे लागत आहे. शिवाय स्वच्छ पाण्यासाठी इतरत्र फिरण्याची वेळ आली आहे. याबाबत एलअॅण्डटी गांभीर्य घेणार का? हे पहावे लागणार आहे.