रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकामाचा शुभारंभ
सारस्वत बँक जंक्शन मार्गांवरील काम : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 31 लाख निधी मंजूर
मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद हद्दीतील सारस्वत बँक जंक्शन ते हॉटेल सागर किनारा तसेच गोडावून रस्ता ते सारस्वत बँक रस्ता या मार्गावर पावसाळी पाणी निचरा साठी रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकाम करणे यासाठी सुमारे 31 लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक नागरिक विक्रम मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेविका मेघा सावंत , नगरसेवक महेश कोयंडे, महेश करमळकर, निखिल नेमळेकर आदी उपस्थित होते. विकासकामे होत असताना ती दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत. त्या दृष्टीने कामे पुर्ण करा अशा सूचना नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी ठेकेदारांना दिल्या.
फोटो : मालवण शहरात पावसाळी पाणी निचरा साठी रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकाम करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला. (अमित खोत, मालवण)
Home महत्वाची बातमी रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकामाचा शुभारंभ
रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकामाचा शुभारंभ
सारस्वत बँक जंक्शन मार्गांवरील काम : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 31 लाख निधी मंजूर मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद हद्दीतील सारस्वत बँक जंक्शन ते हॉटेल सागर किनारा तसेच गोडावून रस्ता ते सारस्वत बँक रस्ता या मार्गावर पावसाळी पाणी निचरा साठी रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकाम […]
