मराठी भाषेचे संवर्धन आवश्यक
सी. वाय. पाटील यांचे प्रतिपादन : साठे प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला प्रारंभ
बेळगाव : मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या भाषेचे संवर्धन करणे प्रत्येकाचे काम आहे. संपूर्ण देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे तिचा आदर करणे आणि जास्तीत जास्त व्यवहारात वापर करणे आवश्यक आहे, असे विचार सी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनी बेळगाव यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. शनिवारी या पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात बोलत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खजिनदार मालोजी अष्टेकर, सचिव सुभाष ओऊळकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फुले दांपत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. साठे प्रबोधिनीतर्फे 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत काव्य गायन, कवी संमेलन, कथाकथन, वाचन कथा, हस्तलिखित, लेखक आपल्या भेटीला आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी हर्षदा सुंठणकर यांनी परिचय करून दिला. इंद्रजित मोरे यांनी सूत्रसंचालन केले. गजानन सावंत यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मराठी भाषेचे संवर्धन आवश्यक
मराठी भाषेचे संवर्धन आवश्यक
सी. वाय. पाटील यांचे प्रतिपादन : साठे प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला प्रारंभ बेळगाव : मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या भाषेचे संवर्धन करणे प्रत्येकाचे काम आहे. संपूर्ण देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे तिचा आदर करणे आणि जास्तीत जास्त व्यवहारात वापर करणे आवश्यक आहे, असे विचार सी. […]
