राज्यात काँग्रेस 20 जागांवर विजय मिळविणार

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा विश्वास : भाजपच्या जाहीरनाम्यात केवळ आश्वासने बेळगाव : भाजपकडून मागच्या कार्यकाळात जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला महत्त्व उरलेले नाही. भावनांचा विचार केला, मात्र जनतेचा विचार केला नाही. सत्तेत असताना दिलेले वचन पाळण्यात आलेले नाही. सत्ता गेल्यानंतर काय साध्य करणार? त्यामुळे या जाहीरनाम्याला महत्त्व उरले नाही, असे […]

राज्यात काँग्रेस 20 जागांवर विजय मिळविणार

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा विश्वास : भाजपच्या जाहीरनाम्यात केवळ आश्वासने
बेळगाव : भाजपकडून मागच्या कार्यकाळात जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला महत्त्व उरलेले नाही. भावनांचा विचार केला, मात्र जनतेचा विचार केला नाही. सत्तेत असताना दिलेले वचन पाळण्यात आलेले नाही. सत्ता गेल्यानंतर काय साध्य करणार? त्यामुळे या जाहीरनाम्याला महत्त्व उरले नाही, असे उपमुख्यमंत्री  व केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. तर राज्यात 20 जागांवर विजय मिळविणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भाजपकडून आपल्या कार्यकाळात अनेक आश्वासने देण्यात आली होती. त्यांची पूर्तता झाली आहे का? असा सवाल त्यांनी केला. काळापैसा आणण्याचे आश्वासन दिले होते. तो पैसा आणून कोणाला वाटप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र कोणत्याच शेतकऱ्याला त्याचा लाभ करुन देण्यात आला आहे? हे दाखवून देण्यात यावे. 2 कोटी रोजगार कोणाला देण्यात आले आहेत? कोरोना काळामध्ये 20 लाख कोटींची मदत दिली असल्याचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन सांगत आहेत. हा निधी कोणाला दिला? याची यादी जाहीर करावी, असे आव्हानही डी. के. शिवकुमार यांनी भाजपला दिले.
काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पाळली आहेत. त्यामुळेच जनतेने काँग्रेसला बहुमत देवून निवडून आणले आहे. मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. त्यामुळे आश्वासनांची पुर्तता न  करणाऱ्या भाजपला जनतेने का मतदान द्यावे. केवळ आश्वासने देवून उपयोग नाही त्यांची पुर्तता करणे आवश्यक आहे. भाजपकडून लोकसभेसाठी राज्यामध्ये 14 नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. जुन्या उमेदवारांना वगळून नवीन उमेदवारांना संधी देवून नवा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र हा प्रयोग त्यांचा यशस्वी ठरणार नाही, असेही शिवकुमार यांनी सांगितले. महिला सबलीकरणाला प्राधान्य देवून काँग्रेस पक्षाने महिलांना अधिक सक्षम बनविले आहे. गॅरंटी योजनांच्या माध्यमातून आर्थिकरित्या सबळ बनविण्यात आली आहे. मात्र  कुमारस्वामी यांनी खालच्या पातळीवर वक्तव्य करुन महिलांचा अपमान केला आहे. यासाठी समस्त महिलांनी निषेध करुन आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार राजू सेठ, आमदार अशोक पट्टण, आमदार राजू कागे, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार धिरज देशमुख आदी उपस्थित होते.