ढवळीकर यांना देवाकडून काँग्रेस विजयाचा ‘प्रसाद’
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका
मडगाव : देवाने गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा स्पष्ट ‘प्रसाद’ वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांना दिल्याची आपणास पूर्ण खात्री आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. सुदिन ढवळीकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे तीनही आमदार दुसऱ्या पक्षात जातील, या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी ढवळीकर यांनी स्वत:च्या आमदारांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. पक्षांतर विरोधी कायदा अधिक मजबूत करण्यासाठी संविधानाच्या दहाव्या परिशिष्टात सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाने नागरिकांना दिले आहे. ढवळीकर यांनी पक्षांतरांवर नेहमीच आवाज उठवला आहे. पक्षांतराबद्दल भाजपच्या जाहीरनाम्यात काहीही नाही. त्यांनी भाजपशी युती तोडून या महत्त्वाच्या मुद्द्यावर इंडियाला पाठिंबा द्यावा, असेही आलेमाव यांनी म्हटले आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वत:चे मगोचे आमदार सोबत आहेत की, भाजपच्या मांडीवर बसले आहेत याचा शोध घ्यावा. आम्ही जेथे आहोत तेथे सुखी आहोत. काँग्रेसचे उमेदवार म्हणून कामगिरी करणे सुरूच ठेवणार आहोत, असे युरी आलेमाव म्हणाले.
Home महत्वाची बातमी ढवळीकर यांना देवाकडून काँग्रेस विजयाचा ‘प्रसाद’
ढवळीकर यांना देवाकडून काँग्रेस विजयाचा ‘प्रसाद’
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका मडगाव : देवाने गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा स्पष्ट ‘प्रसाद’ वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांना दिल्याची आपणास पूर्ण खात्री आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. सुदिन ढवळीकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे तीनही आमदार दुसऱ्या पक्षात जातील, या केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आलेमाव […]