तिकीटाची शास्वती नसणाऱ्यांच्या मागे जनता नाही….महाडिक भविष्य केव्हापासून बघायला लागले; सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीमध्ये सामील होताना बरं वाटलं होतं मात्र आता तिकिटासाठी त्याच उमेदवरांना मारामारी करावी लागत आहे. तिकिटासाठी ज्यांना पळपळ करावी लागत आहे त्यांच्या मागे जनता राहणार नाही. जे स्वतःचे तिकीट आणू शकत नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच शाहू महाराज हेच जनतेचा आवाज असून ते […]

तिकीटाची शास्वती नसणाऱ्यांच्या मागे जनता नाही….महाडिक भविष्य केव्हापासून बघायला लागले; सतेज पाटील यांचा सवाल

महायुतीमध्ये सामील होताना बरं वाटलं होतं मात्र आता तिकिटासाठी त्याच उमेदवरांना मारामारी करावी लागत आहे. तिकिटासाठी ज्यांना पळपळ करावी लागत आहे त्यांच्या मागे जनता राहणार नाही. जे स्वतःचे तिकीट आणू शकत नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच शाहू महाराज हेच जनतेचा आवाज असून ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न नक्कीच सोडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. आज शहरातील शिवाजी स्टेडियमवर त्यांच्या प्रचार आणि संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शाहू छत्रपती यांच्या बरोबर आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री पाटील शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, संजय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीबी पाटील उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, “इंडिया आघाडीकडून शाहू महाराजांना एकमुखाने उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचाराची सुरुवातही झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावरून शंका आहेत. जे महायुतीमध्ये सामील झाले त्यांना महायुतीमध्ये सामील होताना बरं वाटलं होतं. मात्र आता तिकिटासाठी पुन्हा मारामारी करावी लागत आहे. तिकिटासाठी पळापळ करावी लागणाऱ्यांच्या मागे जनता उभी राहणार नाही. जे स्वतःचे तिकीट आणू शकत नाही ते जनतेचे प्रश्न काय सोडवणार ? शाहू महाराज हे जनतेचा आवाज आहेत. ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न नक्कीच सोडवतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच विरोधकांचा आत्मविश्वास आता गेलेला असून भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी 7 खासदारांनी इच्छा व्यक्त केली असल्याचंही सांगीतल्याचीही आठवण त्यांनी करून दिली.
महाडिक भविष्य केव्हापासून बघायला लागले…
महाराष्ट्रात काँग्रेसची एकही जागा येणार नसल्याचं भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी विधान केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी विचारल्यावर त्यांनी हसत उत्तर दिले. महाडिक भाकीत कधीपासून सांगू लागले हे मला माहित नसून जर तसे असेल तर माझी कुंडली त्यांच्याकडे पाठवतो. असा मिष्किल टोलाही त्यांनी हाणला.
काँग्रेसचे जागा येणार नाही तर मग 5 टप्प्यात निवडणुका का लावल्या. काँग्रेसचे नेते फोडायची वेळ भाजपवर का आली आहे. भाजप उसनं अवसान आणण्याचा काम करत आहे. लोक भाजपविरोधात मतदान करण्यासाठी वाट बघत होते. आता संधी त्यांच्याकडे चालुन आली असल्याचं म्हटलं आहे.
हातकणंगलेबाबत योग्य तो निर्णय लवकरच….
यावेळी सतेज पाटील यांनी हातकणंगलेबाबत जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाल्याचं सांगितलं. या संदर्भात राजू शेट्टी यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं कळतयं. वंचित बरोबरही चर्चा करण्याचा प्रयत्न आज सकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे हातकणंगले संदर्भात एक- दोन दिवसात निर्णय होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
‘वंचित’बाबत अजूनही सकारात्मक…
वंचित बहूजन आघाडीच्या एकला चलो रे च्या नाऱ्यावर बोलताना सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणून वंचित आमच्यासोबत यावी ही आमची अपेक्षा होती. मात्र जागावाटपात काही नाराजी दिसून येत आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही चर्चेतून मार्ग निघत असेल तर मार्ग काढण्यासाठी कॉँग्रेस सकारात्मक असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.
उदयनराजेंचा अपमान भुषणावह नाही…
उदयनराजे यांनी दिल्लीमध्ये तिकिटासाठी ठाण मांडूण बसल्यावर त्यांना भेट देण्यात आली नव्हती. दिल्लीमध्ये त्यांचा असा अपमान महाराष्ट्राच्या दृष्टीने भूषणावह नाही. हा अपमान महाराष्ट्राची जनता बघत आहे.राजगादीचा मान महाविकास आघाडीने ठेवला असून भाजपकडून मात्र डावललं जात आलं आहे.