इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नागपूर हिवाळी अधिवेशनात आले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. पण यामुळे महायुतीत (Mahayuti) नवा वाद निर्माण झाला आहे.  उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यावर नाराजी जाहीर केली आहे. यावरूनच काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवालत्यांनी उपस्थित केला. फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर आता नाना पटोले यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ते पत्र ट्वीटही केले पण दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा पार्टनर खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांना कसे चालतात ? ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेलं आहे मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरा व्यक्ती देशप्रेमी आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. हेही वाचा महिलांसाठी एसी ट्रेनमध्ये अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता

इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नागपूर हिवाळी अधिवेशनात आले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. पण यामुळे महायुतीत (Mahayuti) नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यावर नाराजी जाहीर केली आहे. यावरूनच काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवालत्यांनी उपस्थित केला. फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर आता नाना पटोले यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ते पत्र ट्वीटही केले पण दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा पार्टनर खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांना कसे चालतात ? ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेलं आहे मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरा व्यक्ती देशप्रेमी आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. 
हेही वाचामहिलांसाठी एसी ट्रेनमध्ये अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता

जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नागपूर हिवाळी अधिवेशनात आले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. पण यामुळे महायुतीत (Mahayuti) नवा वाद निर्माण झाला आहे. 

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यावर नाराजी जाहीर केली आहे. यावरूनच काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवालत्यांनी उपस्थित केला.

फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर आता नाना पटोले यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ते पत्र ट्वीटही केले पण दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा पार्टनर खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांना कसे चालतात ? ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेलं आहे मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरा व्यक्ती देशप्रेमी आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. 


हेही वाचा

महिलांसाठी एसी ट्रेनमध्ये अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता

Go to Source