काँग्रेस मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही -वर्षा गायकवाड

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या मुंबईत एका बैठकीत बोलताना म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण ओबीसी वर्गातून मिळावं. काँग्रेस मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.

काँग्रेस मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही -वर्षा गायकवाड

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या मुंबईत एका बैठकीत बोलताना म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण ओबीसी वर्गातून मिळावं. काँग्रेस मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, केंद्रात त्यांची सत्ता असून देखील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. 

त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघात हल्ला केला. त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणूक झाल्यावर महायुतीला लाडकी बहीण योजना आठवली. इथे तुम्ही राज्यात लाडकी बहीण योजना आणता आणि दुसरी कडे स्वतःचा पत्नीला बहिणीच्या विरोधात उभे करता. हीच तुमची रणनीती आहे का? 

विरोधी पक्षाच्या नेत्याने संसदेत जात जनगणनेची मागणी केली असून राहुल गांधी यांनी संसदेत जात  गणनेबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचे त्या म्हणाल्या.   

Edited by – Priya Dixit   

Go to Source