जैनापूर येथील अनेकांचा काँग्रेसप्रवेश

प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्याचा निर्धार बेळगाव : काँग्रेस पक्षाचे सिद्धांत, विकासकामे व सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांना पसंती देऊन जैनापूर गावातील अनेकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्याला अत्याधिक आनंद झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. चिकोडी येथील कवटगीमठनगर येथील गृह कार्यालयात रायबाग तालुक्यातील जैनापूर गावातील 20 हून अधिक जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश […]

जैनापूर येथील अनेकांचा काँग्रेसप्रवेश

प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्याचा निर्धार
बेळगाव : काँग्रेस पक्षाचे सिद्धांत, विकासकामे व सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांना पसंती देऊन जैनापूर गावातील अनेकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्याला अत्याधिक आनंद झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. चिकोडी येथील कवटगीमठनगर येथील गृह कार्यालयात रायबाग तालुक्यातील जैनापूर गावातील 20 हून अधिक जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस पक्षाकडून नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्य करण्यात आले आहे. त्यामुळे या पक्षाच्या सिद्धांत व कार्याची दखल घेऊन जैनापूर गावामधील अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ही आनंदाची बाब आहे. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून देण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.