काँग्रेसचा प्रयत्न केवळ अस्तित्वासाठीच!

लोकसभा निवडणूक मतदानाच्या पहिल्या चार टप्प्यांमध्येच विरोधकांचा पराभव झाला आहे. आता काँग्रेसचा सारा प्रयत्न केवळ 50 जागा मिळवून आपले अस्तित्व राखण्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात फतेपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या सभेत केला आहे. या लोकसभा निवडणुकीचा परिणाम प्रारंभापासूनच स्पष्ट होता. राहुल गांधींना अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचे साहस होणार […]

काँग्रेसचा प्रयत्न केवळ अस्तित्वासाठीच!

लोकसभा निवडणूक मतदानाच्या पहिल्या चार टप्प्यांमध्येच विरोधकांचा पराभव झाला आहे. आता काँग्रेसचा सारा प्रयत्न केवळ 50 जागा मिळवून आपले अस्तित्व राखण्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात फतेपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या सभेत केला आहे. या लोकसभा निवडणुकीचा परिणाम प्रारंभापासूनच स्पष्ट होता. राहुल गांधींना अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचे साहस होणार नाही, हे मी काही आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले होते. माझे म्हणणे खरे ठरले आहे. राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ निवडला आहे. मात्र, रायबरेलीतूनही त्यांचा पराभव निश्चितपणे होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
आदित्यनाथांचा आदर्श घ्या
बुलडोझरचा उपयोग कसा आणि कोणाच्या विरोधात करायचा, हे विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकले पाहिजे. विरोधी पक्षनेते माफिया किंवा समाजविरोधी शक्तींविरोधात नव्हे, तर अयोध्येतील भगवान रामलल्लांच्या मंदिरावरच बुलडोझर फिरविण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. पण मतदार हे जाणतात. त्यामुळे ते या निवडणुकीतही विरोधकांना धूळ चारणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचा विजय आता निश्चित झाला असून मतगणनेच्या दिवशी त्याचे प्रत्यंतर येणार आहे. विरोधक केवळ सन्मान राखण्याठी मैदानात आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथेही प्रचारसभा घेतली. दोन्ही सभांमध्ये त्यांनी विरोधकांवर विकासविरोधी आणि समाजात फूट पाडण्याचे राजकारण केल्याचा आरोप केला.
दहा वर्षांमध्ये प्रचंड प्रगती
गेल्या 10 वर्षांमध्ये देशाने मोठी प्रगती केली आहे. गरीबांसाठी अनेक योजना केंद्र सरकारने लागू केल्या आहेत. त्यांचा लाभ कोट्यावधी लोकांना मिळाला असून त्यांचे जीवनमान सुधारले आहे. उज्ज्वला योजना. गरीबांसाठी घर बांधणी योजना, नळपाणी योजना आणि शेतकऱ्यांसाठी अनेक उत्तम धोरणे आम्ही लागू केली आहेत. त्यांचा योग्य परिणाम होऊन अर्थव्यवस्था सुधारली आहे. महामार्ग निर्मिती आणि पायाभूत सुविधांची निर्मिती विक्रमी प्रमाणात झाली आहे. देशाचे जे भाग आजवर हेतुपुरस्सर दुर्लक्षित ठेवण्यात आले होते, तेथेही विकासाची गंगा नेण्यात सरकारला यश मिळाले आहे. जनतेला हे माहीत असून यावेळीही आम्हालाच विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.