कापोली परिसरात काँग्रेसचा प्रचार

खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यानी ग्रामीण भागात प्रचार सुरू केला जावून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. कार्यकर्त्यानी कापोली परिसरातील गावोगावी प्रचार दौरा केला असून यावेळी त्यांनी रोजगार हमीच्या कामगारांशी चर्चा करून काँग्रेसने सुरू केलेल्या योजनांची माहिती देवून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खानापूर […]

कापोली परिसरात काँग्रेसचा प्रचार

खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यानी ग्रामीण भागात प्रचार सुरू केला जावून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. कार्यकर्त्यानी कापोली परिसरातील गावोगावी प्रचार दौरा केला असून यावेळी त्यांनी रोजगार हमीच्या कामगारांशी चर्चा करून काँग्रेसने सुरू केलेल्या योजनांची माहिती देवून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की, राज्य कॉग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजनांचा तुम्हा सर्वानाच लाभ मिळत आहे. तेव्हा या योजनाबरोबर केंद्रात काँग्रेसचे सरकार आले.. वर्षाकाठी 1 लाख रुपये गृहलक्ष्मी निधी महिलाना दिला जाणार आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणणार आहेत. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून काँग्रेसला विजयी करावे. यावेळी कापोली ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन संदीप देसाई म्हणाले, काँग्रेसने कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने खानापूर तालुक्याची मान उंचावला आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील जनतेने अंजली निंबाळकर यांना प्रचंड मतदान करून लोकसभेला पाठवून देऊ .असे मत व्यक्त केले.  यावेळी कापोली के. जी. गावचे रोजगार हमी योजनेचे कामगार व गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.