कलामंदिर जागेच्या फाईलवरून बैठकीत गोंधळ
मालमत्तांची माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याने आश्चर्य : पे अॅण्ड पार्किंगवर जोरदार चर्चा : महसूल विभागाला माहिती असणे गरजेचे
बेळगाव : महानगरपालिकेच्या शहरात किती जागा आहेत, याचीच माहिती अधिकाऱ्यांना नसल्याचे अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आले. महत्त्वाचे म्हणजे कलामंदिर परिसरातील जागेचा खटला न्यायालयात सुरू आहे. मात्र या जागेबाबतची संपूर्ण माहिती कोणालाच नसल्याचे दिसून आले. महसूल विभागाला त्याची माहिती असणे गरजेचे आहे. मात्र ती फाईलच नसल्याचे दिसून आले. यामुळे शुक्रवारी दुपारी झालेल्या अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ उडाला. स्थायी समितीच्या चेअरमन वीणा विजापुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. महानगरपालिकेची मालमत्तेची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे. मात्र अनेक जागा व इमारतींबाबतची माहिती महसूल विभागाला नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी जाहिरात फलक उभे करणे, तसेच काही व्यक्तींना त्यांच्या उद्योगाच्या नावाने त्याठिकाणी सुशोभिकरण करण्यासाठी जागा महानगरपालिकेकडून देण्यात आली. मात्र ती जागा किती वर्षांसाठी दिली गेली आहे, याची माहितीदेखील अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून आले. एकूणच महानगरपालिकेच्या जागांबाबत अधिकाऱ्यांना काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
संबंधितांना नोटीस द्या
धर्मवीर संभाजी चौक येथे महानगरपालिकेच्या जागेवर पार्किंग करण्यात येते. मात्र त्याचा कर कॅन्टोन्मेंट वसूल करत आहे. हे चुकीचे असून संबंधितांना नोटीस द्यावी, अशी सूचना रवी धोत्रे यांनी केली आहे. बापट गल्ली येथीलही पार्किंगबाबत जोरदार चर्चा झाली. त्याठिकाणी उद्घाटन करण्यात आले. मात्र अद्याप बहुमजली इमारत पार्किंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. केएलई रोडवर अनेकांनी अतिक्रण केले आहे. हे अतिक्रमण हटवून त्याठिकाणी महानगरपालिकेतर्फे शेड उभारून भाड्याने देण्याबाबत चर्चा झाली. एकूणच अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत जागा तसेच पार्किंगसंदर्भात जोरदार चर्चा झाली. या बैठकीला सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी, नगरसेवक जिरग्याळ, श्रीशैल कांबळे यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.
पे अॅण्ड पार्किंगबाबतही गोंधळ
शहरातील विविध चौकांमध्ये पे अॅण्ड पार्किंगबाबत टेंडर देण्यात आले आहेत. मात्र हे टेंडर देताना चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिली गेली आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून योग्य समर्पक उत्तरे आली नाहीत. सिव्हिल हॉस्पिटल रोड ते कोल्हापूर सर्कल आणि एसपी रोडवरील अबकारी कार्यालयापर्यंत पार्किंगसाठी टेंडर काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. लवकरच टेंडर काढण्याचे ठरविण्यात आले.
Home महत्वाची बातमी कलामंदिर जागेच्या फाईलवरून बैठकीत गोंधळ
कलामंदिर जागेच्या फाईलवरून बैठकीत गोंधळ
मालमत्तांची माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याने आश्चर्य : पे अॅण्ड पार्किंगवर जोरदार चर्चा : महसूल विभागाला माहिती असणे गरजेचे बेळगाव : महानगरपालिकेच्या शहरात किती जागा आहेत, याचीच माहिती अधिकाऱ्यांना नसल्याचे अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आले. महत्त्वाचे म्हणजे कलामंदिर परिसरातील जागेचा खटला न्यायालयात सुरू आहे. मात्र या जागेबाबतची संपूर्ण माहिती कोणालाच नसल्याचे दिसून आले. महसूल […]