नीट परीक्षेमधील गैरकारभाराची न्यायालयीन चौकशी करा

बेळगाव : नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. प्रशासनाने याची न्यायालयीन चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. शेख शोएब संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांनी निवेदन स्वीकारले. नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकाच केंद्रातील 67 विद्यार्थी 100 टक्के […]

नीट परीक्षेमधील गैरकारभाराची न्यायालयीन चौकशी करा

बेळगाव : नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. प्रशासनाने याची न्यायालयीन चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. शेख शोएब संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांनी निवेदन स्वीकारले. नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकाच केंद्रातील 67 विद्यार्थी 100 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळेच यामध्ये मोठा गैरकारभार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही विद्यार्थ्यांना 718 ते 719 गुण देण्यात आले आहेत. ते नियमाला धरून नाहीत. त्यामुळे यामध्ये गैरकारभार झाल्याचा संशय आहे. सदर भाग स्पर्धा परीक्षा भरविणाऱ्या प्राधिकाराकडून गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
यासाठी प्रशासनाने याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे. प्रारंभी परीक्षेचा निकाल 14 जून 2024 ला जाहीर करणार असल्याचे नीटकडून सांगण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या दिनीच हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळेच यावर संशय व्यक्त केला जात आहे. पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे. या स्कॅममध्ये मेडिकल ट्युशन सेंट्रलचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशा गैरकारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महम्मद जुनेद रझा, डॉ. समीउल्ला, डॉ. शेख शोएब आदी उपस्थित होते.