राजा टाईल्स-मऱ्याम्मा मांदिर रस्ता काँक्रीटीकरणास आजपासून सुरवात

रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार खानापूर : शहरांतर्गत असलेल्या राजा टाईल्स ते मऱ्याम्मा मंदिर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम बुधवार सायंकाळपासून हाती घेण्यात आले आहे. यासाठी गुरुवारपासून या रस्त्यावरील दुचाकीसह सर्व वाहतूक पूर्णपणे पुढील दोन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी आणि प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आले आहे. […]

राजा टाईल्स-मऱ्याम्मा मांदिर रस्ता काँक्रीटीकरणास आजपासून सुरवात

रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार
खानापूर : शहरांतर्गत असलेल्या राजा टाईल्स ते मऱ्याम्मा मंदिर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम बुधवार सायंकाळपासून हाती घेण्यात आले आहे. यासाठी गुरुवारपासून या रस्त्यावरील दुचाकीसह सर्व वाहतूक पूर्णपणे पुढील दोन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी आणि प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरांतर्गत राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे. यातील दुसरा टप्पा राजा टाईल्स ते मऱ्याम्मा मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. राजा टाईल्स ते मऱ्याम्मा मंदिर हा रस्ता सध्या साडेपाच मीटरचा डांबरी रस्ता आहे. याच रस्त्यावर व्हाईट टॉपिंग करून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने पर्यायी रस्त्याची सोय सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच दुचाकीसाठी सध्या असलेल्या रस्त्याच्या बाजूने सोय करण्यात येणार आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी नागरिकांनी पुढील दोन महिने सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.