सर्वसामान्यांची भाकरीही महागली

ज्वारी, बाजरी, गहूसह तांदळाच्या किमती गगणाला बेळगाव : कडधान्य, डाळी पाठोपाठ गहू, बाजरी आणि ज्वारीच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी आता महागली आहे. मागील काही दिवसात गहू आणि ज्वारीचा भाव भडकला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता वाढत्या महागाईचा चटका बसू लागला आहे. आधीच महागाईने जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अशक्य झाले आहे. त्यातच आता […]

सर्वसामान्यांची भाकरीही महागली

ज्वारी, बाजरी, गहूसह तांदळाच्या किमती गगणाला
बेळगाव : कडधान्य, डाळी पाठोपाठ गहू, बाजरी आणि ज्वारीच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी आता महागली आहे. मागील काही दिवसात गहू आणि ज्वारीचा भाव भडकला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता वाढत्या महागाईचा चटका बसू लागला आहे. आधीच महागाईने जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अशक्य झाले आहे. त्यातच आता दैनंदिन भाकरीसाठी लागणाऱ्या ज्वारीच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकावर परिणाम झाला आहे. दैनंदिन आहारात चपातीसाठी गहू व भाकरीसाठी तांदूळ व ज्वारीचा वापर केला जातो. मात्र, गहू व ज्वारीच्या किमती  आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणी चिंताग्रस्त बनल्या आहेत. किरकोळ बाजारात गहू 38 ते 40 रुपये किलो तर ज्वारी तब्बल 40 रुपयांहून 80 रु. झाली आहे. मागील दोन वर्षांत ज्वारी दुपटीने वाढली आहे. त्यामुळे ज्वारी खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू लागली आहे. डाळींच्या किमती दीडशे रुपयांच्या पुढे आहेत. त्यापाठोपाठ आता गहू, तांदूळ, बाजरी आणि ज्वारीच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. दरम्यान, वाढत्या दरामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे तातडीने सरकारने वाढते दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

Go to Source