व्यापारी पदपथांवर अन् पादचारी रस्त्यावर

बेळगाव : पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या पदपथावर अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी ‘पदपथ असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहरुनगर ते सदाशिवनगरकडे जाणाऱ्या दुपदरी रस्त्याच्या पदपथावर चक्क चारचाकी वाहने विक्री केली जात आहेत. त्यामुळे पदपथ गायब झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी ते अजमनगर, बसवण्णा मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या […]

व्यापारी पदपथांवर अन् पादचारी रस्त्यावर

बेळगाव : पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या पदपथावर अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी ‘पदपथ असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहरुनगर ते सदाशिवनगरकडे जाणाऱ्या दुपदरी रस्त्याच्या पदपथावर चक्क चारचाकी वाहने विक्री केली जात आहेत. त्यामुळे पदपथ गायब झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी ते अजमनगर, बसवण्णा मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या पदपथावर व्यापाऱ्यांनी ठाण मांडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे सायंकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. नागरिक रस्त्यावरच वाहने थांबवून व्यापार करत असतात. परिणामी अपघाताला कारण ठरत आहे. नेहरुनगर बसवण्णा मंदिर येथून सदाशिवनगरकडे जाणाऱ्या दुपदरी रस्त्यावर असाच प्रकार सुरू आहे. येथील चार विक्रेत्यांकडून वाहने पदपथावर पार्किंग करून विक्री केली जात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी असणारे ‘पदपथ असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पदपथांवर अतिक्रमण
महानगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने असे प्रकार शहरात वाढीस लागले आहेत. सुरळीत वाहतुकीसाठी रस्त्यांचे रुंदीकरण करून पदपथ निर्माण करण्यात येत आहेत. मात्र या पदपथांवर व्यापारी अतिक्रमण करीत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे पदपथांवर अतिक्रमण वाढल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे.