आज पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले, नवे दर जाणून घ्या
Commercial gas cylinder : ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्येही तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ केली. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. आता राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1691.50 रुपयांना मिळणार आहे. आतापर्यंत याची किंमत 1652.50 रुपये होती.
त्याचप्रमाणे कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 38 रुपयांनी महागला आहे. आता त्याची किंमत 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढून 1644 रुपयांवर पोहोचली आहे, तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1855 रुपयांपर्यंत वाढली आहे.
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना उपलब्ध आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत अनुक्रमे 829 रुपये, 802.5 रुपये आणि 818.5 रुपये आहे.
Edited By – Priya Dixit