कमर्शियल सिलिंडर दरात 14 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 14 ऊपयांनी वाढ झाली आहे. या वाढीसह 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,755.50 ऊपयांवरून 1,769.50 ऊपये प्रतिसिलिंडर झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 फेब्रुवारीपासून म्हणजेच गुरुवारपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांच्या खिशावर ताण पडला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 1 फेब्रुवारी […]

कमर्शियल सिलिंडर दरात 14 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 14 ऊपयांनी वाढ झाली आहे. या वाढीसह 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,755.50 ऊपयांवरून 1,769.50 ऊपये प्रतिसिलिंडर झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 फेब्रुवारीपासून म्हणजेच गुरुवारपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांच्या खिशावर ताण पडला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी 19 किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या असून ज्या आजपासून लागू झाल्या आहेत.