झोळंबे पांडुरंग मंदिरात 7 दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचेही आयोजन ओटवणे | प्रतिनिधी झोळंबे येथील सद्गुरू वासुदेव महाराजांच्या अमृत महोत्सवी वर्ष समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पांडुरंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला आणि संत तुकाराम महाराज गाथा पारायणाला रविवारी सकाळी विधिवत प्रारंभ झाला. ह.  भ  . प सद्गगुरू वासुदेव महाराज वझे यांचे परमभक्त असलेला श्री संत […]

झोळंबे पांडुरंग मंदिरात 7 दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचेही आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
झोळंबे येथील सद्गुरू वासुदेव महाराजांच्या अमृत महोत्सवी वर्ष समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पांडुरंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला आणि संत तुकाराम महाराज गाथा पारायणाला रविवारी सकाळी विधिवत प्रारंभ झाला. ह.  भ  . प सद्गगुरू वासुदेव महाराज वझे यांचे परमभक्त असलेला श्री संत तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय व अनुयायी भक्तमंडळी यांच्या सेवेतून होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी २४ डिसेंबरला होणार आहे.यानिमित्त पांडुरंग मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता काकड आरती व महापूजा, सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत संत तुकाराम महाराज गाथा पारायण, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ६ वाजता वारकरी व नारदीय कीर्तन तसेच भजन, सहस्त्र दीपोत्सव, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व त्यानंतर दिंडी रात्री निमंत्रित भजने आदी कार्यक्रम आटोपल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांची भजने, भक्ती संगीत, अभंगवाणीचा वारकरी दिंडीचा कार्यक्रम होणार आहेत. रविवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी संत तुकाराम महाराज गाथा पारायणाची समाप्ती होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता दयानंद सावंत (गोवा) यांचे काल्याचे किर्तन होणार असून दुपारी महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.
 

Go to Source