जांबोटी भागात उन्हाळी मिरची उत्पादनाला प्रारंभ

शेतकरी वर्ग रोपावरील पिकलेली मिरची तोडून वाळविण्याच्या कामात व्यस्त वार्ताहर /जांबोटी जांबोटी भागासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाळी मिरची (गि•ाr मिरची) उत्पादनाच्या हंगामाला प्रारंभ झाला असून मिरची हे या भागातील मुख्य नगदी पीक असल्यामुळे त्यापासून या भागातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. या भागात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात भातकापणीनंतर शेतकरी वर्ग पाणथळ शेतवडीमध्ये मोठ्याप्रमाणात मिरची लागवड […]

जांबोटी भागात उन्हाळी मिरची उत्पादनाला प्रारंभ

शेतकरी वर्ग रोपावरील पिकलेली मिरची तोडून वाळविण्याच्या कामात व्यस्त
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी भागासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाळी मिरची (गि•ाr मिरची) उत्पादनाच्या हंगामाला प्रारंभ झाला असून मिरची हे या भागातील मुख्य नगदी पीक असल्यामुळे त्यापासून या भागातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. या भागात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात भातकापणीनंतर शेतकरी वर्ग पाणथळ शेतवडीमध्ये मोठ्याप्रमाणात मिरची लागवड करतात. एप्रिल महिन्यापासून या भागात मिरची उत्पादनाला प्रारंभ होतो. सध्या या भागात मिरची उत्पादनाला मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाल्यामुळे शेतकरी वर्ग मिरची रोपावरील पिकलेली मिरची तोडून ती वाळविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. या भागातील जांबोटी, आमटे, कालमणी, हब्बनहट्टी, तोराळी, बैलूर, गोल्याळी तसेच नेरसा, शिरोली आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गि•ाr मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. मिरची रोपांची लागवड करण्यापासून ती सुकविल्यानंतर बाजारात विक्रीसाठी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. मिरची उत्पादनासाठी शेतकरी काबाडकष्ट घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ देखील मिळतो.
मिरचीला गोव्यात मोठ्या प्रमाणात मागणी
जांबोटी भागात उत्पादित होणाऱ्या उन्हाळी मिरचीला गोवा तसेच किनारपट्टी भागात मोठ्याप्रमाणात मागणी असते. मिरची उत्पादनांचा हंगाम एप्रिल महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत ऐन बहरात असल्यामुळे मिरची खरेदीसाठी गावोगावी व्यापारी वर्ग दाखल होतात. दोन वर्षापूर्वी मिरची खरेदीदार 500 ते 600 रुपये प्रतीकिलो होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत होता. मात्र दोन वर्षापासून मिरची खरेदी दरात मोठ्याप्रमाणात घसरण झाली असून सध्या व्यापारीवर्गाकडून 350 ते 500 रुपये प्रती किलो दराने मिरचीची खरेदी सुरू असल्यामुळे शेतकरी वर्गाना आर्थिक फटका बसत आहे. मिरची उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागत असल्यामुळे शासनाने मिरची पिकालाही हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.