सुटीतील मध्यान्ह आहार वितरणाला प्रारंभ

रोजच्या भोजनाचे फोटो पाठवावे लागणार : 28 मे पर्यंत आहाराचे वितरण बेळगाव : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना सुटीच्या काळामध्येही शाळांमध्ये मध्यान्ह आहार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याच्या अंमलबजावणीला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव शहरासह तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात आले. 28 मे पर्यंत या आहाराचे वितरण केले जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 3,236 शाळांमध्ये […]

सुटीतील मध्यान्ह आहार वितरणाला प्रारंभ

रोजच्या भोजनाचे फोटो पाठवावे लागणार : 28 मे पर्यंत आहाराचे वितरण
बेळगाव : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना सुटीच्या काळामध्येही शाळांमध्ये मध्यान्ह आहार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याच्या अंमलबजावणीला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव शहरासह तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात आले. 28 मे पर्यंत या आहाराचे वितरण केले जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 3,236 शाळांमध्ये मध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 3 लाख 20 हजार 529 विद्यार्थ्यांनी मध्यान्ह आहारासाठी अर्ज केला होता. याची दखल घेऊन शुक्रवारपासून सरकारी व अनुदानित शाळांमध्ये आहाराचे वितरण सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी एक परिपत्रक काढून प्रत्येक शाळेने मध्यान्ह आहाराचे वितरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर्षी पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धान्याचे उत्पादन म्हणावे तितके झाले नसल्याने भविष्यात कुपोषणाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यातील शाळांमध्ये उन्हाळी सुटीतही मध्यान्ह आहार वितरणाचा निर्णय घेतला. त्यानुसार 12 एप्रिल ते 28 मे दरम्यान सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह आहाराचे वितरण केले जाणार आहे.
जीपीएसद्वारे फोटो पाठविण्याची सक्ती
मध्यान्ह आहारातील काळाबाजार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने अनोखी शक्कल लढविली आहे. मध्यान्ह आहाराचे वितरण करताना शिक्षकांना फोटो काढून ते शिक्षण विभागाकडे पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु, जुनेच फोटो पाठविण्याची शक्यता असल्याने शिक्षण विभागाने जीपीएस करूनच फोटो पाठविण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना आहार वितरण करतानाचा फोटो शिक्षण विभागाला पाठवावा लागत आहे.