राज्याच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढणार

बेंगळूर : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. 14 नोव्हेंबर रोजी बिदरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. राज्यातील मैदानी भागात हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील बहुतेक भागात विशेषत: कर्नाटकच्या उत्तरेकडील अंतर्गत भागात थंडीचा जोर वाढेल, असा इशाराही दिला आहे. बेंगळूर […]

राज्याच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढणार

बेंगळूर : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. 14 नोव्हेंबर रोजी बिदरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. राज्यातील मैदानी भागात हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील बहुतेक भागात विशेषत: कर्नाटकच्या उत्तरेकडील अंतर्गत भागात थंडीचा जोर वाढेल, असा इशाराही दिला आहे. बेंगळूर शहरातील किमान तापमान 17.2 अंश सेल्सिअस होते. जे एचएएल विमानतळ वेधशाळेत अनुक्रमे 1 अंश सेल्सिअस आणि 0.7 अंश सेल्सिअसने कमी होऊन 16.9 अंश सेल्सिअस झाले. बेळगाव विमानतळ वेधशाळेत किमान तापमान 11.6 अंश सेल्सिअस होते. जे सामान्यपेक्षा 4.8 अंश सेल्सिअस कमी होते. विजापूर आणि धारवाड येथे अनुक्रमे 12.4 आणि 12 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. म्हैसूर आणि शिमोगा येथे अनुक्रमे 17.8 आणि 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमान होते.