CNG आणि PNGच्या दरात वाढ

दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. तर पीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये वाहनांना सीएनजी आणि घरांना पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने ही माहिती दिलीआहे. 9 जुलैच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. सीएनजी आणि पीएनजी यांची मागणी वाढत आहे, तर पुरवठा कमी आहे. त्यामुळे कंपनीकडून ज्यादा बाजारभावाने नैसर्गिक वायू खरेदी केला जात आहे. त्यामुळे सीएनची आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.  कंपनीच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीची भरपाई करण्यासाठी, सीएनजीची किंमत प्रति किलो 1.50 रुपये आणि घरगुती पीएनजीची किंमत 1 रुपये प्रति किलोने वाढवली आहे.  दरवाढीनंतर नवीन किंमत काय असेल? दरांमधील वाढीनंतर सीएनजीची किंमत सर्व करांसह 75 प्रति किलोवर पोहोचली आहे. तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील पीएनजीची किंमत प्रति किलो 48 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने 22 जून रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली होती.हेही वाचा पनवेल : सिडकोवासीयांना 10 ते 11 जुलैला पाणीपुरवठा होणार नाहीचेन पुलिंगच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या चिंतेत वाढ

CNG आणि PNGच्या दरात वाढ

दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. तर पीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये वाहनांना सीएनजी आणि घरांना पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने ही माहिती दिलीआहे. 9 जुलैच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.सीएनजी आणि पीएनजी यांची मागणी वाढत आहे, तर पुरवठा कमी आहे. त्यामुळे कंपनीकडून ज्यादा बाजारभावाने नैसर्गिक वायू खरेदी केला जात आहे. त्यामुळे सीएनची आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीची भरपाई करण्यासाठी, सीएनजीची किंमत प्रति किलो 1.50 रुपये आणि घरगुती पीएनजीची किंमत 1 रुपये प्रति किलोने वाढवली आहे. दरवाढीनंतर नवीन किंमत काय असेल?दरांमधील वाढीनंतर सीएनजीची किंमत सर्व करांसह 75 प्रति किलोवर पोहोचली आहे. तर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील पीएनजीची किंमत प्रति किलो 48 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीत इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने 22 जून रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली होती.हेही वाचापनवेल : सिडकोवासीयांना 10 ते 11 जुलैला पाणीपुरवठा होणार नाही
चेन पुलिंगच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या चिंतेत वाढ

Go to Source