भाजप प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आज खानापुरात

बाळेकुंद्री खुर्दमध्येही 4 रोजी जाहीर सभा बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. 2 रोजी भाजपच्या प्रचारासाठी खानापूरमध्ये येत आहेत. दुपारी 3.30 वाजता खानापूर शहरातील मलप्रभा स्टेडियमवर सभा घेतली जाणार आहे. कॅनरा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी […]

भाजप प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे आज खानापुरात

बाळेकुंद्री खुर्दमध्येही 4 रोजी जाहीर सभा
बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार दि. 2 रोजी भाजपच्या प्रचारासाठी खानापूरमध्ये येत आहेत. दुपारी 3.30 वाजता खानापूर शहरातील मलप्रभा स्टेडियमवर सभा घेतली जाणार आहे. कॅनरा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिली आहे. भाजपचे बेळगाव लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी शनिवार दि. 4 रोजी बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथे जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे प्रमुख पदाधिकारी या प्रचारसभेला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारामध्ये व्यस्त असल्याने बेळगावमधील सभांच्या वेळापत्रकात बुधवारी तातडीने बदल करण्यात आला. त्यामुळे बदललेल्या वेळापत्रकानुसार अधिकाधिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.