सर्वेक्षणाच्या नावावर मतदारांची नोंदणी बंद करा

निवडणूक आयोगाचा राजकीय पक्ष, उमेदवारांना निर्देश वृत्तसंस्था /नवी दिल्ली राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सर्वेक्षणाच्या नावावर मतदारांच्या नोंदणीचे वृत्त समोर आल्यावर निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदार नोंदणीचे प्रकार बंद करण्याचा निर्देश आयोगाने दिला आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून स्वत:च्या प्रस्तावित लाभार्थी योजनांसघ्ठी विविध सर्वेक्षणाच्या आडून मतदारांचा तपशील मागणे निवडणूक कायद्याच्या अंतर्गत एक […]

सर्वेक्षणाच्या नावावर मतदारांची नोंदणी बंद करा

निवडणूक आयोगाचा राजकीय पक्ष, उमेदवारांना निर्देश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सर्वेक्षणाच्या नावावर मतदारांच्या नोंदणीचे वृत्त समोर आल्यावर निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदार नोंदणीचे प्रकार बंद करण्याचा निर्देश आयोगाने दिला आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून स्वत:च्या प्रस्तावित लाभार्थी योजनांसघ्ठी विविध सर्वेक्षणाच्या आडून मतदारांचा तपशील मागणे निवडणूक कायद्याच्या अंतर्गत एक भ्रष्ट वर्तन असल्याचे आयोगाने गुरुवारी म्हटले आहे. काही राजकीय पक्ष आणि उमेदवार वैध सर्वेक्षण आणि निवडणुकीनंतर लाभ पोहोचविणाऱ्या योजनांसाठी लोकांना नोंदणीकृत करण्याच्या पक्षपातपूर्ण प्रयत्नांदरम्यानची रेषा धूसर करत असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. आयोगाने दिशानिर्देश जारी करत सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशक राजकीय पक्षांना कुठलीही जाहिरात, सर्वेक्षण किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून निवडणुकीनंतर लाभार्थी योजनांसाठी लोकांची नोंदणीसदृश कुठलीही कृती त्वरित बंद करयणचा आणि यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. निवडणुकीनंतरच्या लाभांसाठी नोंदणी करावी म्हणून मतदारांना आमंत्रित करण्याची कृती मतदार आणि प्रस्तावित लाभादरम्यान देवाणघेवाणीच्या संबंधांचा आभास निर्माण करू शकते. यामुळे एका विशेष प्रकारे मतदारासाठी प्रलोभन मिळत असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.