जिव्हाळा सेवाश्रम संस्थेच्या वतीने पिंगुळी स्मशानभूमीत स्वच्छता

वार्ताहर/ कुडाळ श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम संस्थेच्या वतीने पिंगुळी गावातील एमआयडीसी परिसरामध्ये येणाऱ्या सार्वजनिक स्मशानभूमीत स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्मशानभूमीतील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी म्हणून स्मशानभूमीमध्ये बसून अल्पोपहार करण्यात आला.श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, जिव्हाळा सेवाश्रम ही संस्था समाजातील निराधार, […]

जिव्हाळा सेवाश्रम संस्थेच्या वतीने पिंगुळी स्मशानभूमीत स्वच्छता

वार्ताहर/ कुडाळ
श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम संस्थेच्या वतीने पिंगुळी गावातील एमआयडीसी परिसरामध्ये येणाऱ्या सार्वजनिक स्मशानभूमीत स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्मशानभूमीतील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी म्हणून स्मशानभूमीमध्ये बसून अल्पोपहार करण्यात आला.श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, जिव्हाळा सेवाश्रम ही संस्था समाजातील निराधार, अनाथ, विकलांग घटकांसाठी अनाथ,निराधार, होतकरू विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी काम करीत असते. ही संस्था गोमातेचे संवर्धन संरक्षण, जोपासना करण्यासाठी म्हणून गोशाळेच्या माध्यमातूनही काम करीत आहे.या स्वछता मोहिमेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे, उपाध्यक्ष राजू बिर्जे, पिंगुळी सरपंचअजय आकेरकर, ग्रा. पं. सदस्य मंगेश चव्हाण,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू खोबरेकर,कार्यालयीन अधीक्षक जयप्रकाश प्रभू,सल्लागार समिती सदस्य बाबी गावडे, संतोष सांगळे, नाना राऊळ, संजय बिर्जे, रोहित मुणगेकर,राजू मुरकुटे,जनसंपर्क अधिकारी प्रसाद पोईपकर सहभागी झाले होते.अजय आकेरकर म्हणाले, संस्थेने राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ग्रामपंचायतीला केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही संस्थेचे आभारी आहोत. याचीच प्रेरणा घेऊन इतर संस्था, समाजातील घटकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.सुरेश बिर्जे म्हणाले, भविष्यामध्ये आपण जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी अशाच प्रकारे साफसफाईची मोहीम राबविणार आहोत. आम्ही संस्थेकडून एक सुरुवात केली आहे. असे त्यांनी सांगितले.