जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात साफसफाई
कालबाह्या कागदपत्रांची लावणार विल्हेवाट
बेळगाव : क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील जुनी कागदपत्रे काढण्याच्या कामाला मागील चार दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. कालबाह्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयात सर्वत्र कागदपत्रांचे ढिगारे पहायला मिळत आहेत. सध्या सरकारी शाळांना सुट्या असल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयात ये-जा करणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. बेळगाव शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक जुनी कागदपत्रे तशीच साठवून ठेवण्यात आली होती. यामुळे कार्यालयात बसण्यासाठी कर्मचाऱ्यांना जागा उपलब्ध होत नव्हती. यामुळे कागदपत्रांच्यामध्ये खुर्च्या लावून कार्यालय चालवावे लागत होते. यासाठी मागील चार दिवसांपासून जुनी कागदपत्रे व फायली काढण्याचे काम सुरू आहे.
शाळांना सुटीमुळे मिळाला वेळ
शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी कालबाह्या कागदपत्रांची तपासणी करत असून त्यानंतर त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जी कागदपत्रे महत्त्वाची आहेत, ती कागदपत्रे स्वतंत्र कक्षामध्ये एकत्रित केली जात आहेत. सध्या शाळांना सुटी असल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयात इतर कामे कमी असल्याने जुनी कागदपत्रे काढण्यास वेळ मिळाला आहे.
Home महत्वाची बातमी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात साफसफाई
जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात साफसफाई
कालबाह्या कागदपत्रांची लावणार विल्हेवाट बेळगाव : क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील जुनी कागदपत्रे काढण्याच्या कामाला मागील चार दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. कालबाह्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयात सर्वत्र कागदपत्रांचे ढिगारे पहायला मिळत आहेत. सध्या सरकारी शाळांना सुट्या असल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयात ये-जा करणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. बेळगाव […]