सलग तिसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांशी चकमक

छत्तीसगडमध्ये आणखी एका नक्षलीला कंठस्नान वृत्तसंस्था/ रायपूर छत्तीसगडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई सुरू आहे. सुकमा येथे शनिवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीदरम्यान एका नक्षलीला कंठस्नान घालण्यात आले असून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला. सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले असून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. छत्तीसगडच्या कमकानारच्या […]

सलग तिसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांशी चकमक

छत्तीसगडमध्ये आणखी एका नक्षलीला कंठस्नान
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई सुरू आहे. सुकमा येथे शनिवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीदरम्यान एका नक्षलीला कंठस्नान घालण्यात आले असून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला. सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले असून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
छत्तीसगडच्या कमकानारच्या जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी दुपारी चकमक झाल्याची माहिती सुकमाचे पोलीस प्रमुख किरण चव्हाण यांनी दिली. यापूर्वी शुक्रवारी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता. एसटीएफचे पथक नक्षलविरोधी अभियान आटोपून परतत असताना ही चकमक झाली होती. याआधी गुऊवारी विजापूर-नारायणपूर सीमेवरील पल्लेवया-हंदवाडा भागात झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा दल आपल्या छावणीकडे परतत असताना नक्षलवाद्यांनी एसटीएफच्या पथकावर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले होते.
चालू वर्षात 114 नक्षलींचा खात्मा
या वर्षात आतापर्यंत राज्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 114 नक्षलवादी ठार झाले आहेत. यापूर्वी 10 मे रोजी छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले होते. तर 30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह 10 नक्षलवादी मारले गेले. याशिवाय 16 एप्रिल रोजी कांकेर जिह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 29 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.