नागपुरात औरंगजेबाच्या कबरेच्या वादावरून दोन गटांमध्ये संघर्ष, वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. महाल परिसरात दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. वाहनांना आग लावण्यात आली. दोन्ही गटांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी वाहनांमधील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलने निर्दशन केले त्या दरम्यान ही घटना घडली.
ALSO READ: औरंगजेबाची कबर मराठा शौर्याचे प्रतीक आहे, शौर्याचे प्रतीक पाडू नये संजय राऊतांचे विधान
नागपुरात बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषद ने रॅलीचे आयोजन केले होते. या रॅली नंतर जिल्हाधिकाऱ्यांना औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी करणारे निवेदन सादर करणार होते. रॅली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे जात असताना काही विरोधी गटाने विरोध केला त्यामुळे दोन गटात हाणामारी झाली आणि परिस्थिती बिघडली.दोन्ही बाजूने दगडफेक सुरु झाली. या हल्ल्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
ALSO READ: औरंगजेबाच्या कबरवरून राजकारण तीव्र, पोलिसांनी सुरक्षा कडेकोट केली
नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक म्हणतात की, काही गैरसमजामुळे ही घटना घडली. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. आमची ताकद इथे खूप आहे. मी सर्वांना बाहेर न जाण्याचे आवाहन करतो. दगडफेक करू नका. दगडफेक झाली, म्हणून आम्ही बळाचा वापर केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापरही केला.
ALSO READ: VHP आणि बजरंग दलाच्या मागण्यांवर रामदास आठवले म्हणाले ‘औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा काही फायदा नाही’
डीसीपी म्हणाले की काही वाहनांना आग लागली होती, आम्ही अग्निशमन दलाला बोलावून आग विझवली. काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत माझ्या पायालाही थोडी दुखापत झाली. पण आम्ही सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नका आणि पोलिसांना सहकार्य करा. आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत.
Edited By – Priya Dixit