छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळण्याचे प्रकरण आता जोर धरत आहे. विरोधक यावरून राज्य सरकारवर टीका करत आहे. बुधवारी या वरून शिवसेना युबीटीचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते नारायण राणेंच्या …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळण्याचे प्रकरण आता जोर धरत आहे. विरोधक यावरून राज्य सरकारवर टीका करत आहे. बुधवारी या वरून शिवसेना युबीटीचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही पक्ष नेत्यांचे समर्थक सिंधुदुर्गात पुतळा पडला त्या ठिकाणी पोहोचले तिथे दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. 

बुधवारी आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली आणि पुतळा पडल्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच वेळी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे , निलेश राणे आपल्या समर्थकांसह गडावर पोहोचले. आणि आदित्य ठाकरेंना गडावर प्रवेश देण्यावरून पोलिसांशी वाद करू लागले. काही वेळातच दोन्ही पक्ष नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या प्राशितीवर पोलिसांनी अथक प्रयत्नाने नियंत्रण मिळवले. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुतळा कोसळल्यावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, वाऱ्यामुळे पुतळा पडल्याचा मुख्यमंत्रीचा दावा मूर्खपणाचा आहे. महायुती सरकार मध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी निषेध मोर्चा 1 सप्टेंबर रोजी मुंबईत काढणार आहे. 

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source