दुहेरी नागरिकत्वप्रकरणी लवकरच केंद्राकडून होणार स्पष्टीकरण
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : दुहेरी नागरिकत्व आणि पोर्तुगालमधील जन्मनोंदणी या प्रकरणी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयातर्फे लवकरच स्पष्टीकरण जारी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केली याचा अर्थ पोर्तुगालचे नागरिकत्व घेतले, असा होत नाही, असेही त्यांनी सांगितले. केंद्राकडून स्पष्टीकरण आल्यानंतर पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी करणाऱ्यांना तसे प्रमाणपत्र (सरेंडर) देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुनर्रचना आयोगाची स्थापना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत डॉ. सावंत यांनी वरील माहिती उघड केली आहे. त्यांनी दिल्ली भेटीत विविध केंद्रीय मंत्री आणि नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचे सांगून ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्याचे भाजपचे उमेदवार कोण हे आता लपून राहिलेले नाही तर ते उघड गुपित आहे. तो उमेदवार सर्वांना यापूर्वीच माहीत झालेला आहे. दक्षिण गोव्याचा उमेदवार अजून ठरलेला नाही. एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासूनच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी दुहेरी नागरिकत्वप्रकरणी लवकरच केंद्राकडून होणार स्पष्टीकरण
दुहेरी नागरिकत्वप्रकरणी लवकरच केंद्राकडून होणार स्पष्टीकरण
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती पणजी : दुहेरी नागरिकत्व आणि पोर्तुगालमधील जन्मनोंदणी या प्रकरणी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयातर्फे लवकरच स्पष्टीकरण जारी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केली याचा अर्थ पोर्तुगालचे नागरिकत्व घेतले, असा होत नाही, असेही त्यांनी सांगितले. केंद्राकडून स्पष्टीकरण आल्यानंतर पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी करणाऱ्यांना तसे प्रमाणपत्र (सरेंडर) देण्यात येणार […]