पुढील दोन दिवसात राज्यातील पाऊस ओसरणार
पुढील दोन दिवसात राज्यातील (Today 30 Sep Rain Update) पाऊस परतीच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान विभागाकडून आज (30 सप्टेंबर) मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगराला कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज गरबा प्रेमींना आनंदात गरबा खेळता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील इतर भागात कसा असेल पाऊस?राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होणार असल्याचे संकेत आहे.1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरलाही कोकणातील काही पट्टा सोडता इतर भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दोन्ही दिवसात मुंबई, ठाणे आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Home महत्वाची बातमी पुढील दोन दिवसात राज्यातील पाऊस ओसरणार
पुढील दोन दिवसात राज्यातील पाऊस ओसरणार
पुढील दोन दिवसात राज्यातील (Today 30 Sep Rain Update) पाऊस परतीच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जात आहे.
हवामान विभागाकडून आज (30 सप्टेंबर) मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगराला कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज गरबा प्रेमींना आनंदात गरबा खेळता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील इतर भागात कसा असेल पाऊस?
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होणार असल्याचे संकेत आहे.
1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरलाही कोकणातील काही पट्टा सोडता इतर भागात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दोन्ही दिवसात मुंबई, ठाणे आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.