दर 6 महिन्यांनी बदलते नागरिकत्व

रात्री एका देशात झोपतात, पहाट दुसऱ्या देशात कुठल्याही देशाच्या कायदेशीर नागरिकालाच त्या देशाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळतो. कुठल्याही देशाच्या नागरिकत्वासाठी अनेक प्रकारचे निकष पूर्ण करावे लागतात. भारतात राहणाऱ्या नागरिकाने अन्य देशाचे नागरिकत्व पत्करल्यावर त्याला भारतीय नागरिकत्व गमवावे लागते. परंतु जगात एक असा भूभाग आहे, जेथे राहणाऱ्या लोकांचे नागरिकत्व दर 6 महिन्यांनी बदलत असते. फ्रान्स आणि […]

दर 6 महिन्यांनी बदलते नागरिकत्व

रात्री एका देशात झोपतात, पहाट दुसऱ्या देशात
कुठल्याही देशाच्या कायदेशीर नागरिकालाच त्या देशाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळतो. कुठल्याही देशाच्या नागरिकत्वासाठी अनेक प्रकारचे निकष पूर्ण करावे लागतात. भारतात राहणाऱ्या नागरिकाने अन्य देशाचे नागरिकत्व पत्करल्यावर त्याला भारतीय नागरिकत्व गमवावे लागते. परंतु जगात एक असा भूभाग आहे, जेथे राहणाऱ्या लोकांचे नागरिकत्व दर 6 महिन्यांनी बदलत असते. फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेवर वसलेल्या पिझंट बेटाचा किस्सा जगभरात प्रसिद्ध आहे. स्पेन आणि फ्रान्सला स्वत:ची सीमा लागून असलेल्या या बेटाची एक अनोखी प्रथा आहे. या बेटावर राहणारे लोक दर महिन्यांनी स्वत:चे नागरिकत्व गमावतात. वर्षातील 6 महिने हे लोक स्पेनचे नागरिक असतात, तर उर्वरित 6 महिने फ्रान्सचे नागरिक असतात. याकरता स्पेन आणि फ्रान्समध्ये एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्याच आधारावर नागरिकत्वात हा बदल केला जातो. या बेटाला द ट्रीटी ऑफ द पायरेनीसमुळे दर 6 महिन्यांनी दोन्ही देशांमध्ये विभागण्यात येते. याकरता फ्रान्सच्या राजाने स्पेनच्या राजकन्येशी विवाह केला होता. तेव्हापासून आतापर्यत सुमारे 350 पेक्षा अधिक वेळा येथील लोकांचे नागरिकत्व बदलले आहे. हे लोक फेब्रुवारी ते जुलैपर्यंत स्पेनचे नियम मानतात, ऑगस्ट ते जानेवारी अखेरपर्यंत फ्रान्सचे नियम लागू असतात.