हळेतोरगल तांड्यातील नागरिकांचे न्यायासाठी आंदोलन

कसत असलेली वनजमीन नावावर करण्याची मागणी बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील हळेतोरगल तांडा येथील नागरिकांनी न्यायासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेली अनेक वर्षे आपण कसत असलेल्या वनजमिनीत जेसीबीने खड्डे खोदून झाडे लावण्यासाठी आलेल्या वनखात्यालाही त्यांनी रोखले आहे. शंकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली न्यायासाठी लमाणी समाजातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. हळेतोरगल तांडा येथे साठ कुटुंबीय वास्तव्य करून […]

हळेतोरगल तांड्यातील नागरिकांचे न्यायासाठी आंदोलन

कसत असलेली वनजमीन नावावर करण्याची मागणी
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील हळेतोरगल तांडा येथील नागरिकांनी न्यायासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेली अनेक वर्षे आपण कसत असलेल्या वनजमिनीत जेसीबीने खड्डे खोदून झाडे लावण्यासाठी आलेल्या वनखात्यालाही त्यांनी रोखले आहे. शंकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली न्यायासाठी लमाणी समाजातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. हळेतोरगल तांडा येथे साठ कुटुंबीय वास्तव्य करून आहेत. गेल्या 70 ते 80 वषर्पांसून ते उपजीवनासाठी वनजमीन कसतात. शेतीव्यतिरिक्त इतर कोणताही उद्योग नाही. या लमाणी कुटुंबीयांच्या मालकीची इतर ठिकाणी जमीनही नाही. त्यामुळे आपण कसत असलेली जमीन आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांनी वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन पाठविले आहे. बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीने खड्डे खोदून झाडे लावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी त्यांना अडविले. आपण कसत असलेली जमीन आपल्यालाच मिळावी, अशी मागणी शंकर चव्हाण यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.