सरकारी योजनांमुळे नागरिकांचा शेतीमध्ये वाढला रस

कृषिमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांचे प्रतिपादन : बेंगळुरात कृषी मेळाव्याचा समारोप बेंगळूर : विविध सरकारी कार्यक्रम, योजना, कृषी विद्यापीठाचे संशोधन, नवीन वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्र समृद्ध आहे. त्यामुळे सार्वजनिकांचाही शेतीमध्ये रस वाढला आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी केले. रविवारी जीकेव्हीके येथे बेंगळूर कृषी विद्यापीठाने आयोजित ‘कृषी मेळावा-2025’च्या समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री पुढे म्हणाले, शहरातील […]

सरकारी योजनांमुळे नागरिकांचा शेतीमध्ये वाढला रस

कृषिमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांचे प्रतिपादन : बेंगळुरात कृषी मेळाव्याचा समारोप
बेंगळूर : विविध सरकारी कार्यक्रम, योजना, कृषी विद्यापीठाचे संशोधन, नवीन वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्र समृद्ध आहे. त्यामुळे सार्वजनिकांचाही शेतीमध्ये रस वाढला आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी केले. रविवारी जीकेव्हीके येथे बेंगळूर कृषी विद्यापीठाने आयोजित ‘कृषी मेळावा-2025’च्या समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
मंत्री पुढे म्हणाले, शहरातील लोक आणि आयटीबीटी कंपनीत काम करणाऱ्यांनाही शेतीत रस वाढला आहे. शेतकऱ्यांनी शेतीतून आपले उत्पन्न वाढवावे. शेतीमध्ये एक चळवळ निर्माण झाली पाहिजे. सालुमरद तिमक्का यांनी 5000 हून अधिक झाडे लावली आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या महिलेचे नेहमीच स्मरण केले पाहिजे. कृषी मेळाव्यात 750 हून अधिक स्टॉल असून याचा लाखो लोकांना फायदा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा म्हणाले, लाखो लोक कृषी मेळाव्याला यात्रा समजून सहभागी होत आहेत. या मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल कृषिमंत्री, विद्यापीठाच्या टीमचे अभिनंदन करतो. कृषी मेळावा हा इतर शेतकऱ्यांना आदर्श शेतकऱ्यांची ओळख पटवून आणि त्यांना पुरस्कार देऊन प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. एम. एच. मरिगौडा राष्ट्रीय देणगी सर्वोत्तम बागायती संशोधन पुरस्कार, डॉ. एम. एच. मरिगौडा राज्यस्तरीय सर्वोत्तम बागायती शेतकरी पुरस्कार, डॉ. आर. द्वारकीनाथ शेतकरी पुरस्काराने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.