‘पीकी ब्लाइंडर्स’मध्ये दिसणार सिलियन
सीरिजनंतर चित्रपटात दिसणार थॉमस शेल्बीची जादू
ओपेनहायमर चित्रपटासाठी सिलियन मर्फीने ऑस्कर पटकाविला होता. तर त्यापूर्वी सिलियन हा ‘पीकी ब्लाइंडर्स’ या सीरिजमध्ये दिसून आला होता. मागील वर्षी या सीरिजचा अखेरच सीझन झळकला होता. परंतु आता अभिनेता पुन्हा एकदा पीकी ब्लाइंडर्सद्वारे स्वत:ची जादू दाखवून देणार आहे.
ओपेनहायमर पूर्वी सिलियन अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये झळकला होता, परंतु त्याला जगभरात ओळख वेबसीरिज ‘पीकी ब्लाइंडर्स’ने मिळवून दिली. आता तो पुन्हा याच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, परंतु यावेळी ही सीरिज नव्हे तर चित्रपट असणार आहे.
नेटफ्लिक्सने ‘पीकी ब्लाइंडर्स’ चित्रपटाची घोषणा केली आहे. याचबरोबर मुख्य भूमिका थॉमस शेल्बीसाठी नेटफ्लिक्सने सिलियन मर्फीची निवड केली आहे. चाहत्यांना आता पुन्हा एकदा थॉमस शेल्बी या भूमिकेत सिलियनला पाहता येणार आहे. सिलियनच्या कारकीर्दीत ‘पीकी ब्लाइंडर्स’ एक मैलाचा दगड आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ दिसून आली होती.
टॉम हार्पर नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, तर तर स्टीव नाइट याची कहाणी लिहितील. थॉमस शेल्बीने माझ्यासोबत काम करणे बंद केले नसल्याचे वाटत आहे. पीकी ब्लाइंडर्सच्या चित्रपट आवृत्तीकरता स्टीवन नाइट आणि टॉम हार्परसोबत पुन्हा काम करणे आनंददायी ठरणार असल्याचे उद्गार सिलियन मर्फीने काढले आहेत.
Home महत्वाची बातमी ‘पीकी ब्लाइंडर्स’मध्ये दिसणार सिलियन
‘पीकी ब्लाइंडर्स’मध्ये दिसणार सिलियन
सीरिजनंतर चित्रपटात दिसणार थॉमस शेल्बीची जादू ओपेनहायमर चित्रपटासाठी सिलियन मर्फीने ऑस्कर पटकाविला होता. तर त्यापूर्वी सिलियन हा ‘पीकी ब्लाइंडर्स’ या सीरिजमध्ये दिसून आला होता. मागील वर्षी या सीरिजचा अखेरच सीझन झळकला होता. परंतु आता अभिनेता पुन्हा एकदा पीकी ब्लाइंडर्सद्वारे स्वत:ची जादू दाखवून देणार आहे. ओपेनहायमर पूर्वी सिलियन अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये झळकला होता, परंतु त्याला […]