चुडाप्पा हलगेकर कुस्ती मैदान 11 फेब्रुवारी रोजी

नागराज बशीडोनी-बनिया पंजाब यांच्यात प्रमुख लढत बेळगाव : हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीतर्फे मल्लविद्या जीवंत ठेवण्यासाठी व कुस्तीची परंपरा आबाधित राखण्यासाठी बेळगाव परिसरातील नवोदित व तरुण होतकरू मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी हलगेकर  कुस्ती समितीच्यावतीने बेळगावच्या आनंदवाडी आखाड्यामध्ये रविवार दि. 11 फेब्रुवारीला मोफत कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितच्या वतीने गेली चोवीस वर्षे कुस्ती […]

चुडाप्पा हलगेकर कुस्ती मैदान 11 फेब्रुवारी रोजी

नागराज बशीडोनी-बनिया पंजाब यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीतर्फे मल्लविद्या जीवंत ठेवण्यासाठी व कुस्तीची परंपरा आबाधित राखण्यासाठी बेळगाव परिसरातील नवोदित व तरुण होतकरू मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी हलगेकर  कुस्ती समितीच्यावतीने बेळगावच्या आनंदवाडी आखाड्यामध्ये रविवार दि. 11 फेब्रुवारीला मोफत कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितच्या वतीने गेली चोवीस वर्षे कुस्ती मैदान भरवत आहेत. यावर्षीचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने या वर्षीच्या दंगलीला कर्नाटक केसरी पैलवान नागराज बशीडोणी मारुती घाडी यांचा पट्टा वि. बनिया पैलवान पंजाब अमृतसर  आखाडा यांच्यात लढत होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत करण पंजाब अमृतसर आखाडा वि. कर्नाटकचा उमदा मल्ल प्रकाश इंगळगी तालीम गोडगेरी गोकाक यांच्यात लढत होणार आहे. तेवढ्याच  तोला मोलाची नंबर तीनची कुस्ती बेळगावचा उगवता तारा कीर्तीकुमार बेनके वि. वसंतदादा कुस्ती केंद्र सांगलीचा पैलवान ऋषिकेश भोसेकर यांच्यात होणार आहे. नंबर चारला कर्नाटक कुमार महेश लंगोटी विरुद्ध ऋषिकेश सावंत सांगली यांच्यात लढत होणार आहे. या कुस्त्याबरोबरच इतर बेळगाव ग्रामीण भागातील जवळजवळ 75 कुस्त्या होणार आहेत. महिला कुस्तीपटूना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्यासुद्धा कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष अशोक हलगेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.