शहर परिसरात ख्रिसमस उत्साहात

बेळगाव : शहर परिसरात ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस प्रामुख्याने ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सांताक्लॉजच्या आकर्षणामुळे अनेक कुटुंबांमध्येसुद्धा तो साजरा केला जातो. ख्रिसमसनिमित्त बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची रेलचेल झाली आहे. आठवडाभरापासून नागरिकांनी ख्रिसमस ट्री आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी केली. ख्रिसमस ट्री चर्चमध्ये उभारण्यात आले असून शहरातील सर्व चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिसमसनिमित्त […]

शहर परिसरात ख्रिसमस उत्साहात

बेळगाव : शहर परिसरात ख्रिसमस उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस प्रामुख्याने ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सांताक्लॉजच्या आकर्षणामुळे अनेक कुटुंबांमध्येसुद्धा तो साजरा केला जातो. ख्रिसमसनिमित्त बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची रेलचेल झाली आहे. आठवडाभरापासून नागरिकांनी ख्रिसमस ट्री आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी केली. ख्रिसमस ट्री चर्चमध्ये उभारण्यात आले असून शहरातील सर्व चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिसमसनिमित्त बिशप डेरेक फर्नांडिस यांनी सर्वांना परस्परातील सलोखा वाढविण्याचा संदेश दिला आहे. चर्चमध्ये रात्री सामूहिक प्रार्थना व येशूख्रिस्ताचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर केक वितरण करण्यात आले. चर्चसह ठिकठिकाणी येशूजन्माचा देखावा सादर करण्यात आला आहे.
शहरातील सेंट अँथनी चर्च, मेथॉडिस्ट चर्च, इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, डिव्हाईन मर्सी चर्च, बेळगाव चर्च, माऊंट कार्मेल चर्च, सेंट सेबेस्टियन चर्च, सेंट्रल मेथॉडिस्ट चर्च या ठिकाणी प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती. प्रार्थनेबरोबरच कॅरोल सिंगिंगही झाले. ख्रिसमस आणि सांताक्लॉज यांचे नाते विशेष आहे. सँता येऊन आपल्याला भेटवस्तू देणार, अशा निरागस आनंदामध्ये बालचमू रमलेला असतो. त्यांच्या आनंदासाठी ख्रिस्ती बांधवांबरोबरच अनेक कुटुंबांमध्ये आपल्या मुलांच्या उशीजवळ पालकांनी विविध भेटवस्तू आणून ठेवल्या आणि मुलांचा आनंद द्विगुणित केला. शाळा-शाळांमध्येसुद्धा ख्रिसमस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध बेकरींमध्ये तयार करण्यात आलेल्या केकना विशेष मागणी होती. अर्थात त्याची तयारी बेकरी व्यावसायिकांनी आधीच करून ठेवली होती.