Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

ब्रेड मिल्क केक साहित्य- सहा ब्रेड स्लाइस दोन चमचे तूप 1/4 कप साखर एक कप दूध 1/4 कप मिल्क पावडर आवश्यकतेनुसार पाणी

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

ब्रेड मिल्क केक

साहित्य-

सहा ब्रेड स्लाइस 

दोन चमचे तूप 

1/4 कप साखर 

एक कप दूध  

1/4 कप मिल्क पावडर 

आवश्यकतेनुसार पाणी 

 

कृती-

सर्वात आधी ब्रेडचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करावे. आता कढईत तूप गरम करून त्यात ब्रेडचा चुरा घालावा. व सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावे. आता एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवावे. आता कढईत साखर घालून कॅरमलाइझ करावी. आता दूध घालून आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहावे. आता मिल्क पावडर,  साखर आणि थोडे दूध घालून मिक्स करावे. या द्रावणात ब्रेडचे तुकडे घालावे आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. आता मिश्रण एका भांड्यात ठेवावे. आता बटर पेपरने सेट करावे आणि 2 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे. तर चला तयार आहे आपला ख्रिसमस विशेष ब्रेड मिल्क केक.  

 

ब्रेड गुलाब जामुन

साहित्य-

दहा ब्रेड स्लाइस 

1/4 कप मिल्क पावडर

दोन चमचे तूप  

1/4 चमचा वेलची पूड  

दूध 

दीड कप साखर 

दीड कप पाणी  

 

कृती-

सर्वात आधी ब्रेड बारीक करून घ्या. एका भांड्यात ब्रेडचा चुरा, मिल्क पावडर, तूप, वेलची पूड आणि थोडे दूध एकत्र करून मऊ पीठ तयार करावे. आता या पिठाचे छोटे गोळे बनवावे. कढईत तूप गरम करून हे गोळे सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यावे. तसेच एका पातेलीत पाणी आणि साखर मिक्स करावी व पाक बनवून घ्यावा. पाक थंड झाल्यानंतर गुलाबजामुन पाकमध्ये घालावे. तर चला तयार आहे आपले ख्रिसमस स्पेशल ब्रेड गुलाब जामुन रेसिपी 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik